स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शीचा विकास ठप्प – माजी आमदार राजेंद्र राऊत राजकारणात सक्रिय कधी होणार?
बार्शी तालुक्याचा विकास हा गेल्या काही महिन्यापासून थांबलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बाजारपेठेतील मरगळ, एमआयडीसीचा विकास आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये खंत आहे. विशेषतः, 2024 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यापासून माजी आमदार राजेंद्र राऊत राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. मात्र, आता राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार सत्तेत आले आहे, त्यामुळे बार्शीकरांना प्रश्न पडला आहे की राऊत हे आता विकासासाठी किती सक्रिय होणार? काही दिवसांपूर्वीच राजेंद्र राऊत म्हणाले होते की राजकारणात लवकर सक्रिय होईल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते – “राजेंद्र राऊत माझे बेरर चेक”
माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत जाहीर केले होते की, “राजेंद्र राऊत हे माझे बेरर चेक आहेत.”
आता त्यांच्याकडे एवढी मोठी राजकीय ताकद आहे, ते आत्ता बार्शीच्या विकासासाठी त्या ताकदीचा वापर करणार का?
आता राज्यात त्यांचाच पक्ष सत्तेत आहे, त्यामुळे बार्शीच्या विकासासाठी निधी आणि योजना आणण्यात ते किती पुढाकार घेणार?
बार्शीकरांना केवळ घोषणांचा पाऊस नको, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे.
राजेंद्र राऊत यांचे आश्वासन
राजेंद्र राऊत यांनी बार्शीच्या जनतेला मोठी आश्वासने दिली होती.
एमआयडीसीचा MIDC विस्तार आणि नवीन उद्योग आणण्याचे आश्वासन
तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन
शेतीसाठी साठवण तलाव आणि सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही
घोरवड्या नदीचे रुंदीकरण आणि घोरवड्याचे पुनर्जीवन
परंतु निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते मागे पडले आणि कार्यकर्ते, समर्थक तसेच जनता त्यांच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत.
बार्शी एमआयडीसीत नवीन उद्योग कधी येणार?
बार्शी शहराला औद्योगिक दृष्टिकोनातून मोठी संधी असली, तरी एमआयडीसी (Maharashtra Industrial Development Corporation) मध्ये नवीन उद्योग येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
नवीन कंपन्या गुंतवणूक करण्यास तयार नाहीत, कारण पायाभूत सुविधा अद्याप सुधारलेल्या नाहीत.
औद्योगिक धोरण प्रभावी नाही, परिणामी नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीत.
राजेंद्र राऊत आणि त्यांचे सरकार बार्शीकरांना नवीन उद्योग आणून देऊ शकतील का?
घोरवड्या नदीचे रुंदीकरण आणि घोरवडणाचे पुनर्जीवन रखडले
बार्शी तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी घोरवड्या नदीचे रुंदीकरण आणि घोरवड्या नदीचे पुनर्जीवनाचा मोठा प्रकल्प हाती घेतला जाणार होता,ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार होते.
शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही गंभीर आहे.
राजेंद्र राऊत आता तरी सक्रिय होतील का?
राज्यात स्वतःच्या पक्षाचे सरकार असताना राजेंद्र राऊत हे बार्शीच्या विकासासाठी किती प्रयत्न करणार?
त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होनार का?
बार्शीतील रस्ते, बाजारपेठ आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल का?
बार्शीकरांचा सवाल – विकासाची गती वाढून बाजारपेठ फुलणार का?
बार्शीच्या नागरिकांना आता घोषणांची खैरात नको, तर ठोस कृती हवी आहे. राजेंद्र राऊत आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून बार्शीकरांची स्वप्ने पूर्ण करतील का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
– स्टार माझा न्यूज

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.