स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे कार्यकारिणी जाहीर
परांडा प्रतिनिधी दिनांक 13 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी विशेष जयंती कमिटीची स्थापना करण्यात आली असून, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक कार्यक्रम आखण्याचे ठरवले.
नवीन जयंती कमिटी जाहीर
अध्यक्ष : दादा रणदिवे
उपाध्यक्ष : सुरज बनसोडे
सेक्रेटरी : अभिजीत बनसोडे
जनरल सेक्रेटरी : कुमार बनसोडे
कोषाध्यक्ष : विशाल वाघचौरे
सह कोषाध्यक्ष : अनिकेत बनसोडे
कार्याध्यक्ष : आतिश बनसोडे
संपर्कप्रमुख : आकाश बनसोडे
सह संपर्कप्रमुख : आदेश बनसोडे
प्रमुख सल्लागार
सिद्धार्थ शिंदे, आनंद चौतमाल, अॅड. उमेश चंदनशिवे
प्रमुख सदस्य
उमेश बनसोडे, अक्षय बनसोडे, प्रमोद जाधव, जयपाल बनसोडे, सत्यपाल बनसोडे, प्रवीण वाघचौरे, अमर पालके, अजय बनसोडे, राहुल बनसोडे, अविनाश बनसोडे, पिल्या चौतमाल, सागर वाघचौरे, वेदांत बनसोडे, दीपक बनसोडे, चंद्रपाल पालके, प्रज्वल बनसोडे, सचिन बनसोडे, लहू चौतमाल आदींचा समावेश आहे.
या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, समाज प्रबोधन, व्याख्याने, तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे.
– स्टार माझा न्यूज

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.