स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शी प्रतिनिधी दिनांक 5 मस्साजोग चे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या खुणा मधील मुख्य सूत्रधार सर्व आरोपीचा पाठीराखा धनंजय मुंडे हेच असल्यामुळे त्यांना या खून खड्ड्यांमध्ये प्रमुख आरोपी करा या मागणीसाठी बार्शी तहसील कार्यालय समोर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली. त्याचबरोबर संतोष अण्णा देशमुख यांचा खून खटला फास्टट्रॅक मध्ये चालवावा त्यामुळे राजकीय वर्धस्था असणाऱ्या सर्व गुंडांना कायद्याचा धाक बसेल व महाराष्ट्रातील गुंड प्रवृत्ती देखील थांबेल आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल यासाठी हा खून खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये जावा. सरपंच संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरण यामुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था प्रचंड ढासळली ही सर्व परिस्थिती कायद्याचा व गृह विभागाचा दहा राहिला नसल्यामुळे झाले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बार्शी तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने आनंद काशीद यांनी केली या सर्व बाबीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा होणाऱ्या परिणाम सरकार जबाबदार राहील असे देखील यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी बालाजी डोईफोडे पांडुरंग घोलप रवींद्र मोठा अक्षय बोके पुढे शंकर ठोंबरे सोमनाथ सूर्यवंशी सुरेश कापसे अरबी डेंगळे अशी अनेक मंडळी उपस्थित होती

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.