परांडा रोडवरील खराब दर्जाच्या व अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे अपघातांचा धोका – नागरिक संतप्त.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898


बार्शी: बार्शी शहरात विविध विकासकामे करण्यात आली असून अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटने दर्जेदार बनवले गेले आहेत. मात्र, काही ठिकाणी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नवीनच झालेले रस्तेही खराब अवस्थेत गेले आहेत. विशेषतः परांडा रोडवरील गांधी स्टॉपजवळ (जगदंबा किराणा समोर) उपळाई रोडकडे जाणाऱ्या मार्गावरील गटाराचे स्लॅब कोसळल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.

प्रशासन दुर्लक्ष करत आहे का?
नुकतेच एका चारचाकी वाहनाचा हा स्लॅब तुटल्यामुळे अपघात झाला. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून नगरपालिका प्रशासनाने या कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले का? ठेकेदारांशी आर्थपूर्ण संबंध आहेत का? प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकातून उपस्थित केला जात आहे.



अपघात टाळण्यासाठी नागरिकांची मागणी:

1. तातडीने तुटलेला स्लॅब दुरुस्त करावा.


2. कामाच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करून जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.


3. परांडा रोड व नागणे प्लॉटजवळील नवीन शंभर फूट रस्त्यावर खुला असलेला चेंबर तातडीने सुरक्षित करावा.


4. उपळाई रोडवर वाहतुकीसाठी आवश्यक गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात यावेत, जेणेकरून अपघातांना आळा बसेल.





पूर्वीपासून दुर्लक्ष:
स्टार माझा न्यूजने यापूर्वीही नगरपालिकेच्या दुर्लक्षित विकासकामांवर आवाज उठवला होता, परंतु प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या हलगर्जीपणाला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

मुख्याधिकारी साहेब हे प्रकरण गांभीर्याने घेणार की पुन्हा ठेकेदाराच्या चुकीवर पांघरूण टाकणार? अशी विचारणा नागरिक करत आहेत.

– स्टार माझा न्यूज.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!