स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परांडा दि. 20 फेब्रुवारी 2025 परंडा येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा गडंगणकार तु.दा.गंगावणे हे दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रवाना झाले आहेत. परंडा तालुक्यातील केवळ एक मात्र साहित्यिक म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संमेलनाचे उद्घाटक तर शरद पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहेत तर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून डॉ तारा भवाळकर यांच्या उपस्थितीमध्ये हे साहित्य संमेलन संपन्न होत आहे.

देशाच्या राजधानीत 71 वर्षानंतर होणाऱ्या या साहित्य संमेलनास देशातून सर्व स्तरातील मराठी साहित्य प्रेमी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपस्थित राहत आहेत. त्यामध्ये ( उस्मानाबाद ) धाराशीव जिल्ह्यातून परंडा तालुक्यातील केवळ तु.दा. गंगावणे हे सहभागी झाले आहेत. हे साहित्य संमेलन 21 22 आणि 23 फेब्रुवारी या तीन दिवसासाठी आयोजित केले आहे .

तु.दा. गंगावणे हे या संमेलनामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.फुले आंबेडकर विद्वत्त सभेचे राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा समन्वयक डॉ प्रकाश सरवदे जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे ग्लोबल इन्स्टिट्यूट चे संस्थापक गोरख मोरजकर तथा सचिव शिवमती आशाताई मोरजकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.