पोलीस दलात खळबळ! सोलापूर ग्रामीण पोलिस कर्मचारी महेश पाडुळे यांची आत्महत्या.

Picture of starmazanews

starmazanews



बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क रियाज पठाण, संपादक – स्टार माझा न्यूज 9405749898 // 9408749898



सोलापूर बार्शी, दि. १२ (प्रतिनिधी): सोलापूर ग्रामीण पोलिस दलात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी महेश जोतीराम पाडुळे (वय ४५) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुःखद घटनेमुळे पोलीस दलासह त्यांच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून या घटनेमागील सत्य समोर येईल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

घटनेचा थरार – काय घडले नेमके?

बुधवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास वैराग येथे आपल्या राहत्या घरी महेश पाडुळे यांनी गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वैराग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉ. सागर शिंदे यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबाला मोठा धक्का!

महेश पाडुळे यांच्या जाण्याने त्यांचा कुटुंब पूर्णतः उध्वस्त झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. वर्षभरापूर्वीच त्यांनी वैराग पोलीस ठाण्यात सेवा बजावली होती आणि नंतर त्यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात झाली होती.

पोलिसांची तातडीची कारवाई, पण आत्महत्येचे कारण अजूनही अज्ञात!

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल आणि पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक तपास सुरू केला. मृतदेहाचे बार्शी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी आंजनगाव (ता. माढा) येथे पार पडले.

पोलीस दलात वाढत्या मानसिक तणावाचा धोक्याचा इशारा?

महेश पाडुळे यांच्या आत्महत्येने पोलीस दलातील मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रदीर्घ सेवा तास

कुटुंबाला वेळ न देण्याची मजबुरी

जबाबदाऱ्यांचा प्रचंड ताण
यामुळे अनेक पोलीस कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करतात.


सरकार आणि पोलिस प्रशासनाने लक्ष द्यायला हवे!

राज्य आणि केंद्र सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, तणाव व्यवस्थापन, विश्रांतीसाठी विशेष धोरण लागू करणे आवश्यक आहे. नाहीतर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येणार नाही.

तपास सुरू – सत्य बाहेर येईल का?

सोलापूर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. महेश पाडुळे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय होते? वैयक्तिक तणाव की कामाचा दबाव? हे तपासानंतर स्पष्ट होईल.

पोलीस दलासाठी धक्कादायक असलेल्या या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांच्या वाढत्या मानसिक तणावावर उपाय कधी शोधला जाणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे!

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!