बहुजनांची चळवळ ही बौद्धिक चळवळ झाली पाहिजे – प्रा.डॉ.शिवाजी गायकवाड

Picture of starmazanews

starmazanews



स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे //  गोरख देशमाने

परंडा दि.12 फेब्रुवारी 2025
वंचित बहुजन आघाडी जिल्हा धाराशिच्या वतीने दि.११ फेब्रुवारी रोजी बहुजन राष्ट्रमाता तसेच महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा फुले सभागृह तांबरी विभाग धाराशिव येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना प्रा.डॉ. ्शिवाजी गायकवाड (मराठी विभाग प्रमुख,रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव) म्हणाले की,, “तथागत गौतम बुद्धांने सर्वप्रथम  समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही लोकशाहीची मूल्ये  या भारतभूमीला दिली.   त्यांनी अधिक प्रमाणात  स्त्रियांना वैचारिक स्वातंत्र्य दिले.त्यांनी महिलांच्या बाबतीत समानतेची वागणूक दिली.विनयपिटिकच्या माध्यमातून भंते उपाली यांनी त्या काळात देखील भिक्खू  व भिक्खूणी यांना जगण्यासाठी  नियम व नियमावली यांचे बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केलेले आहे. समाजात परिवर्तन व प्रबोधन केले पाहिजे संतांनी व महापुरुषांनी याबाबतीत नेहमीच आपल्या विचाराच्या माध्यमातून प्रबोधन केलेले आहे.क्रांती म्हणजे संपूर्णता बदल अशा बदलांची गरज आज समाजामध्ये आवश्यक आहे. स्वाभिमान हा माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे म्हणूनच वंचित बहुजन आघाडी ही स्वाभिमानाची चळवळ आहे या चळवळीमध्ये सहभागी होऊन सर्व बुद्धिजीवी कार्यकर्ते यांनी वंचित बहुजन आघाडीला मदत केली पाहिजे आणि बहुजनांचे राज्य आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाला पाहिजे अशा शब्दांमध्ये प्रा. डॉ .शिवाजी गायकवाड यांनी प्रतिपादन केले .इतिहासातील अनेक दाखले देऊन सर्वच राष्ट्रमाता व महापुरुषांचे जीवन लोक कल्याणासाठी होते विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करणे हे ध्येय होते.असे उपस्थितांना  मार्गदर्शन केले “.
    या कार्यक्रम प्रसंगी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव,पक्ष प्रवक्ते एडवोकेट के.टी.गायकवाड,युनूस पटेल, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे,जयश्री कदम, प्रा.महेंद्र चंदनशिवे,राजेंद्र धावारे,विजयमला धावारे,मिलिंद रोकडे,पक्षाचे धाराशिव तालुका अध्यक्ष राहुल पोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


    या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे नामदेव वाघमारे,माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शेखर बनसोडे,प्रशांत शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आकाश पांडागळे,धम्मपाल शिंगाडे,अमोल अंकुशराव यांनी मोलाचे सहकार्य केले.
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे यांनी केले तर प्रस्ताविक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नामदेव वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नसिर शेख यांनी मानले.
  सर्व सन्माननीय विजय गायकवाड,रुस्तम पठाण,अण्णा नन्नवरे,योगीराज वाघमारे,रघुनाथ गायकवाड,महादेव जोगदंड,प्रभाकर बनसोडे,यशवंत शिंदे,विजय बनसोडे,आनंद गाडे,जयराज खुणे,जयशिल कांबळे,आप्पासाहेब शिरसाटे,स्वराज जानराव, विकास भंडारे,नंदकुमार हावळे, येडबा खांडेकर,सचिन गायकवाड,रुक्मिणी ताई बनसोडे,सुरेखा गंगावने,सुजाता बनसोडे,उषा पवार,विद्या शिंदे, मीनाताई मेश्राम,मुमोदनी जानराव,कल्पना धावारे,कामाक्षी खुणे,पार्वती कांबळे,माया वाघमारे,सुरेखा वाघमारे, विरंगणा शिंदे हे सर्व बहुसंख्येने उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!