वैराग (दि. १०): महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट प्रतिपादन वैराग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी केले आहे. विद्यार्थिनींना छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओ आणि टवाळखोर तरुणांना कडक इशारा देताना, अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणतीही गय केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
नवीन माध्यमिक प्रशाला, धामणगाव (ता. बार्शी) येथे त्यांनी शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. “मुलींनी समाजातील वाईट प्रवृत्तीला न घाबरता शिक्षण पूर्ण करावे. जर कोणी अश्लील किंवा आक्षेपार्ह वर्तन केले, तर माझ्या वैयक्तिक नंबरवर कळवा. तुमचे नाव गुप्त राहील, मात्र दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी विद्यार्थिनींना दिला.
कठोर कारवाईचा इशारा
गावडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले. विशेषतः, लहान वयात मुलांना ट्रॅक्टर, वाहने किंवा दुचाकी चालवायला दिल्यास पालकांवर कार्यवाही केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
तसेच, “मुलींनी अल्पवयात प्रेमाच्या गोष्टींमध्ये अडकू नये. त्यामुळे आई-वडिलांची प्रतिष्ठा धोक्यात येते. मोबाईलच्या अतिवापराने सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोबाईलपेक्षा पुस्तकांमध्ये जास्त वेळ द्यावा,” असेही त्यांनी सांगितले.
परीक्षेसाठी शुभेच्छा
यावेळी गावडे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर द्यावा, कोणत्याही गैरप्रकारात अडकू नये आणि भविष्यात एक चांगले करिअर घडवावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमास वैराग पोलिस स्टेशनचे कर्मचारी किसन कोलते, पोलिस पाटील गणेश मसाळ, नवनाथ चौरे, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- स्टार माझा न्यूज संपादक रियाज पठाण 9405749898 //9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.