बार्शी आगाराला १० नव्या एसटी बसेस – प्रवाशांना दिलासा!

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

बार्शी आगारातील एसटी प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाने बार्शी आगाराला नव्याने १० एसटी बसेस प्रदान केल्या आहेत. या बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख नेतेमंडळी, परिवहन महामंडळाचे अधिकारी, एसटी कर्मचारी, चालक-वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन पाठपुरावा

या नव्या बसेसमुळे बार्शी व परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार असून, विद्यार्थ्यांसह रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

प्रवाशांसाठी मोठा दिलासा

बार्शी आगारातील बससेवेची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून मा आ राजेंद्र राऊत यांच्या कडून नवीन बसेससाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.  यासाठी २२ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे थेट ३० नवीन एसटी बसेसची मागणी करण्यात आली होती.तसेच विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनीही मागणी केली होती सर्वांचे प्रयत्न यशस्वी झाले व बार्शीकरांना बसेस मिळाल्या.

आणखी २० बसेस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

सध्या बार्शी आगाराला १० नवीन बसेस मिळाल्या असल्या तरी, उर्वरित २० बसेस लवकरच उपलब्ध होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे प्रवाशांना अजून अधिक सोयीसुविधा मिळण्याची शक्यता आहे.

शासनाचा निर्णय आणि मान्यवरांची उपस्थिती

या नव्या बसेस प्रदान केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानण्यात आले. लोकार्पण सोहळ्यास बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, इतर मान्यवर पदाधिकारी तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️ स्टार माझा न्यूज

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!