स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
तेरणा महाविद्यालय धाराशिव येथील आंतरमहाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेत रा गे शिंदे महाविद्यालयातील विद्याथ्यांचे घवघवीत यश.
परंडा. प्रतिनिधी दि.5 फेब्रुवारी 2025.
धाराशिव येथील तेरणा महाविद्यालयात कै.बाजीराव पाटील आंतर महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धा संपन्न झाली.ही स्पर्धा डॉ.बाबासाहेबआंबेडकर.मराठवाडा .विद्यापिठ,छ.संभाजीनगर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ,सोलापूर या विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांसाठी होती.या स्पर्धेचे हे २७ वे वर्ष होते तसेच या स्पर्धेसाठी “राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या सवंग लोकप्रिय घोषणा राज्याच्या विकासासाठी तारक/मारक आहेत” असा विषय ठेवण्यात आला होता.या स्पर्धेत शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या संघातून कु.सोहम शरद सिरसट B.Sc F.Y. याने अनुकूल बाजूने तर कु.प्रतीक्षा शिवाजी लिमकर B.Sc S.Y. हीने विषयाच्या प्रतिकूल बाजूने भाष्य केले.यामध्ये कु.प्रतीक्षा शिवाजी लिमकर हीने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावून १००० रू.बक्षीस व प्रशस्तीपत्र मिळवले.या संघाला या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे,प्रा.संभाजी धनवे,प्रा.वरपे यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाणे कार्यालयीन अधीक्षक श्रीमती शिंदे पी.एम.यांनी अभिनंदन व कौतुक केले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
![starmazanews](https://secure.gravatar.com/avatar/4fda7f8e27869db8a392615e0d2c6001?s=96&r=g&d=https://starmazanews.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.