स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
मुंबई, 29 जानेवारी 2025 – घरगुती गॅस सिलेंडरमध्ये तुमच्या नकळत फसवणूक केली जात आहे का? वितरक गॅस सिलेंडर देण्यास आल्यानंतर वजन करून देण्याची मागणी करा,गॅस कमी भरलेले सिलेंडर दिले जात आहेत का? जर तुम्ही कधीही तुमच्या गॅस सिलेंडरचे वजन तपासले नसेल, तर तुमचे नुकसान होत असू शकते!
गॅस कमी भरला जातो का? ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या!
अनेक ग्राहकांना असे वाटते की त्यांचा गॅस सिलेंडर अपेक्षेपेक्षा लवकर संपतो. पण यामागचे खरे कारण काय? काही वितरक ग्राहकांना पूर्ण वजनाचे गॅस सिलेंडर देत नाहीत आणि ग्राहकांना याचा पत्ता लागत नाही, गॅस सिलेंडरच्या वजनाची खात्री करा.
पुण्यातील एका गृहिणीने सांगितले, “सामान्यतः माझा गॅस 25-28 दिवस टिकतो, पण काही महिन्यांपासून तो 20-22 दिवसांतच संपतो. जेव्हा मी सिलेंडरचे वजन तपासले, तेव्हा ते 1.5 किलोने कमी होते!”असे अनेक ग्राहक आहेत जे कोणाकडेही तक्रार करत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात आपणही त्यात असू शकतो.
तुमच्या गॅस सिलेंडरचे वजन किती असायला हवे?
गॅस कंपन्यांच्या नियमांनुसार, 14.2 किलो गॅस असलेला घरगुती सिलेंडर साधारणतः 29.5 ते 30 किलो वजनाचा असतो. त्या सिलेंडरचे वजन तेवढे असते का याची प्रत्येक वेळेस खात्री करा.
रिकाम्या सिलेंडरचे वजन (टॅरे वेट) – 15 किलो
गॅसचे वजन (नेट वेट) – 14.2 किलो
जर तुमच्या सिलेंडरचे वजन कमी आढळले, तर हे स्पष्ट फसवणूक आहे असे समजा!
डिलिव्हरी बॉय वजन का करत नाहीत?
अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की डिलिव्हरी करणारे कर्मचारी वजन तपासून देण्यास नकार देतात. काहीजण सांगतात की त्यांच्याकडे वजन काटा नाही, तर काहीजण ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देतात. हे नियमांचे उल्लंघन आहे तात्काळ त्यांच्या तक्रारी गॅस वितरकाकडे करा.
गॅस चोरी टाळण्यासाठी ग्राहकांनी काय करावे?
डिलिव्हरीच्या वेळी वजन मागा – तुमच्याकडे स्वतःचा वजन काटा असेल, तर लगेच वजन तपासा.
सिलेंडरवरील टॅरे वेट आणि प्रत्यक्ष वजन याची तुलना करा.
वजन कमी आढळल्यास डिलिव्हरी बॉयकडून दुसरा सिलेंडर मागा.
वितरकाकडे तक्रार करा आणि ग्राहक सेवा क्रमांकावरही तक्रार नोंदवा.
कोठे तक्रार कराल?
जर वितरक योग्य प्रतिसाद देत नसेल, तर तुम्ही थेट कंपनी किंवा सरकारी यंत्रणांकडे तक्रार करू शकता: त्याचे नंबर पुढील प्रमाणे आहेत
इंडियन ऑइल (IOC) – 1800-2333-555
भारत गॅस (Bharat Gas) – 1800-22-4344
एचपी गॅस (HP Gas) – 1800-2333-555
जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा ग्राहक तक्रार मंच
ग्राहक सतर्क राहिले तरच फसवणूक थांबेल!
गॅस ही तुमच्या घरातील अत्यावश्यक गरज आहे. जर तुम्ही सावध राहिलात आणि वेळोवेळी वजन तपासले, तर फसवणुकीला आळा बसू शकतो. तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपत असेल, तर एकदा त्याचे वजन करून पाहा – तुमच्या पैशांची लूट होतेय का? दक्ष रहा आणि प्रत्येक वेळेस टाकीचे वजन करूनच टाकी घ्या व आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. गॅस वितरकाने काय करावे. गॅस वितरकांनीही प्रत्येक डिलिव्हरी बॉयलर सक्त ताकीद देऊन ग्राहकांनी वजन करून मागितल्यास प्रत्येकाला वजन करून देण्यास सांगण्यात यावे जेणेकरून ग्राहकांचे समाधान होईल वजन करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डिलिव्हरी बॉय वर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.