स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परांडा — येथील शासकीय विश्रामगृह परंडा येथे डी.बी.ए. समूहच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 31 वा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला.
डी.बी.ए.समूहचे संस्थापक/ अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे, महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष बिभीषण खुणे, पोलीस पाटील दिलीप परिहार, (खानापूर),
एडवोकेट दयानंद धेंडे, यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वाराचे प्रतिकृतीचे पूजन केले. याप्रसंगी मा. दयानंद बनसोडे, बिभीषण खुणे, दिलीप परिहार, राजभाऊ शिंदे, इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी मा. पोलीस पाटील दिलीप परिहार (खानापूर), यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र सुरक्षा दल तालुकाध्यक्ष अतुल सोनवणे, डी बी ए समूह मीडिया प्रमुख अमर गायकवाड, महिला अध्यक्ष कांताबाई गायकवाड, अंकुश जमदाडे, भाऊराव पेठे, जमीर भाई सय्यद, माणिक लोखंडे, संतोष मोहिते, रवींद्र शिंदे, सिराज पठाण, मोहन जगताप, शांताराम पाटील, तुकाराम जाधव, रंजना जाधव,जनाबाई जाधव, मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. शेवटी मा.दयानंद बनसोडे यांनी आभार मानले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.