परंड्याचे ग्रामदैवत हजरत ख्वाजा बद्रुद्दिन चिस्ती यांच्या 705 व्या उरुसाला उत्साहात सुरुवात.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज प्रतिनिधी: गोरख देशमाने, परंडा

परंडा तालुक्यातील मोरा येथील ग्रामदैवत आणि सुफी संत हजरत ख्वाजा बुद्रुक (शहीद रहे) यांच्या 705 व्या उरुसाला गुरुवार, दिनांक 9 रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या उरुसासाठी दुपारपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. सायंकाळी परंडा तहसील कार्यालयातून मुख्य संदल मिरवणूक काढण्यात आली.



संदल मिरवणुकीला भव्य सुरुवात
तहसील कार्यालयातून मिरवणुकीस प्रारंभ झाला तहसीलदारांनी डोक्यावर फुलांची चादर घेऊन तसेच मान्यवरांनी  मिरवणुकीत मानाची फुलांची चादर घेऊन घोड्यावर चढवण्यात आली. या मिरवणुकीसाठी परंडा शहरातील दर्गाह मार्ग, मुजावर गल्ली, मंगळवार पेठ या मार्गावरून मिरवणूक पुढे सरसावली. यावेळी फतेहा पठण करून संदल मिरवणुकीची परंपरा जोपासण्यात आली.



मिरवणुकीत विनोद आलम सिद्दिकी, गणेशसिंह सद्धीवाल, फुलांची चादर, तसेच अनेक लोकप्रतिनिधी, व्यापारी, आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


प्रमुख उपस्थित मान्यवर
उरुस सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोगीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) दत्ता साळुंखे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रंजीत पाटील, नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, तसेच व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष वाजिद दखनी यांचा समावेश होता.



सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
उरुस सोहळ्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा नेते रणजीत दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गणीभाई हावरे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, ओबीसी तालुका उपाध्यक्ष नंदू शिंदे, माजी नगराध्यक्ष नसीरभाई शहाबर्फीवाले यांचा समावेश होता.

उरूस सोहळ्यास व्यापारी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले.

उरुसाच्या निमित्ताने परंडा शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. मिरवणुकीदरम्यान दर्गाह परिसरात मोठ्या उत्साहाने चादर चढवण्याचा सोहळा पार पडला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
स्टार माझा न्यूज संपादक:
रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!