स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शी प्रतिनिधी दिनांक ७ व ८ जानेवारी २०२५ वार मंगळवार व बुधवार रोजी ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन लोकमंगल कॉलेज वडाळा या ठिकाणी पार पडले या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातून 48 प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. या मध्ये महाराष्ट्र विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत संपादन केले ते पुढील प्रमाणे दिव्यांग गटातून चि आरुष राहुल शहाणे याने प्रथम क्रमांक मिळवला. माध्यमिक गटातून तृतीय क्रमांक चि तनवीर जमील तांबोळी यांनी मिळवला. याच बरोबर लोकमंगल समुहाने या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यार्थिनिष्ट शिक्षक म्हणून संग्राम दादासाहेब देशमुख यांचा देखील सत्कार केला.या दोन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

वरील यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव ,एस.बी. शेळवणे,सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे,पर्यवेक्षक एस.सी. महामुनी,पर्यवेक्षिका एन.बी. साठे, विज्ञान प्रमुख एस.एम.हाजगुडे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.