धनाप्पा शेटे पोलीस उपनिरीक्षकपदी रुजू; बार्शीच्या ट्रॅफिक व्यवस्थापनात भरीव योगदान.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

बार्शी, दिनांक 9 जानेवारी 2025
उपळाई बु येथील सुपुत्र आणि बार्शी शहरातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी मा. धनाप्पा शेटे यांची नुकतीच बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे बार्शी तालुक्यात आणि त्यांच्या गावात आनंदाची लाट उसळली असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

धनाप्पा शेटे हे शांत, शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अलिकडच्या काळात बार्शी ट्रॅफिक विभागाचे इन्चार्ज म्हणून जबाबदारी सांभाळली. वाहतूक व्यवस्थापनात त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करून शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी भरीव योगदान दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी राबवलेली विविध मोहिमांचे विशेष कौतुक झाले होते.

पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्यासमोर अधिक जबाबदाऱ्या येणार आहेत. स्थानिक गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, तसेच नागरिकांचा पोलीस प्रशासनावर विश्वास वाढवणे यासाठी त्यांनी पुढेही आपली कर्तव्यनिष्ठ सेवा चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

धनाप्पा शेटे यांची कार्यक्षमता आणि सेवाभाव बघता त्यांच्याकडून भविष्यात आणखी चांगले काम होईल, अशी अपेक्षा बार्शी शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल उपळाई बु गावातील ग्रामस्थ,बार्शी शहरातील नागरिक विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

धनाप्पा शेटे यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये लोकांची गर्दी होत आहे .


starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!