मौजे आंदोरा ता . परांडा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबोराचे उद्घाटन तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परांडा दि . 3 जानेवारी 2024 .डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर आणि श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना संचलित विशेष श्रमसंस्कार शिबिर डिजिटल साक्षर व युवा भारत हे ब्रीदवाक्य घेऊन दि . 3 जानेवारी २०२४ रोजी मौजे आंदोरा ता . परांडा येथे उद्घाटन करण्यात आले .
उद्घाटन प्रसंगी परंडा तहसीलचे तहसीलदार निलेश काकडे हे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुनील जाधव उपस्थित होते तर व्यासपीठावर आंदोरा गावचे सरपंच प्रा डॉ दयानंद शिंदे उपसरपंच महावीर कांबळे हनुमंत गोपने ग्रामसेवक यू एस देवकते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नीलकंठ शिंदे उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने व ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .पुढे बोलताना तहसीलदार निलेश काकडे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना या विभागाची व्यापक उद्दिष्टे आहेत ते म्हणजे ज्या समुदायात काम करतात ते समजून घेणे त्यांच्या समुदायाच्या संबंधात स्वतःला समजून घेणे समाजाच्या गरजा आणि समस्या ओळखून त्या समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट होणे आपापसात सामाजिक आणि नागरी जबाबदारीची भावना विकसित करणे असे असून याची सर्व स्वयंसेवकांनी जबाबदारी घेऊन ती पार पाडली पाहिजे .
अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांनी केला ते आपल्या अध्यक्ष समारोपात म्हणाले की विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता येते अनेक जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र राहून एकात्मतेची भावना व्यक्त करता येते . राष्ट्रा प्रत आपली भावना प्रकट करता येते .राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजतो .यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ अमर गोरे पाटील प्रा डॉ कृष्णा परभणे तसेच सह कार्यक्रमाधिकारी म्हणून डॉ अरुण खर्डे डॉ शहाजी चंदनशिवे डॉ सचिन चव्हाण डॉ सचिन साबळे यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे . या शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता जलसंवर्धन व्यक्तिमत्व विकास रक्तदान शिबिर वृक्षारोपण व संवर्धन डिजिटल साक्षरता उपक्रम डिजिटल कौशल्य उपक्रम आरोग्य तपासणी शिबिर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
या शिबिरामध्ये दिनांक 4 जानेवारी रोजी प्रा डॉ हरिश्चंद्र गायकवाड यांचे माहिती तंत्रज्ञान काळाची गरज या विषयावर व्याख्यान होणार आहे तर 5 जानेवारी रोजी ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख यांचे ऑनलाईन सुरक्षितता आणि सायबर सुरक्षा व्यवस्था यावर व्याख्यान होणार आहे दि . 6 जानेवारी रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथील प्राध्यापक डॉ सुयोग अमृतराव यांचे शिक्षणासाठी ऑनलाईन साधने व संसाधने यावर व्याख्यान होणार आहे . दि . 7 जानेवारी रोजी परंडा येथील प्रसिद्ध मोरे हॉस्पिटलचे संचालक डॉ आनंद मोरे यांचे डिजिटल जीवन पद्धती आणि मानसिक आरोग्याचे देखभाल या विषयावर व्याख्यान होणार आहे तर दि . 8 जानेवारी रोजी भगवंत ब्लड बँक बार्शी उपजिल्हा रुग्णालय परांडा व शिक्षण महर्षी गुरुवार रा गे शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या वतीने भव्य रक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . तर दिनांक 9 जानेवारी रोजी या शिबिराची सांगता होणार आहे . या समारोप सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा साळुंके शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धाराशिव श्री संजय निंबाळकर सचिव श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव व अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ सुनील जाधव हे उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ कृष्णा परभणे यांनी केले तर आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले .
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.