मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड, २ जानेवारी २०२५ – मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर, यमुनानगर, निगडीचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे उत्साहात पार पडला. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.



कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा समितीचे अध्यक्ष मा. मानसिंग साळुंके यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलिस महासंचालक मा. विजयसिंह जाधव उपस्थित होते. सा रे ग म प लिटिल चॅम्प्स फेम अनया देसाई हिने आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

स्नेहसंमेलनाची सुरूवात आणि प्रास्ताविक
कार्यक्रमाची सुरूवात शाळेतील उपशिक्षिका सौ. माया सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता २रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग मराडे यांनी प्रास्ताविकात शाळेत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.



गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणारे, तसेच शाळा अंतर्गत व आंतरशालेय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
बक्षिसपात्र विद्यार्थ्यांची नावे उपशिक्षिका सौ. जोगेश्वरी पैलवान यांनी वाचली.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण
स्नेहसंमेलनात इयत्ता १ली ते ४थीच्या ४५० विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये गणेश वंदना, देवीचा जागर, हिरवा निसर्ग, दक्षिण संस्कृतीवरील नृत्य, नारी सन्मान, कारगिल विजय दिवसावर आधारित देशभक्तीपर नृत्य, शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग, नाट्यछटा, तबला जुगलबंदी, भरतनाट्यम यांचा समावेश होता.



विशेष आकर्षण ठरले ते श्री. कैलास माळी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘कारगिल विजय दिवस’ नृत्याला आणि सौ. वैशाली ढाकणे, किरण वारके, सौ. रेखा गोतारणे व सौ. योगिता कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नृत्याला’.

मान्यवरांचे मनोगत
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पाहुण्यांचा परिचय व सत्कार
उपशिक्षक श्री. किरण वारके यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुजाता कुलकर्णी यांनी केले, तर कार्यक्रमासाठी सौ. गीतांजली रायरीकर यांनी गाण्यांचे निवेदन केले.

मान्यवर उपस्थिती
कार्यक्रमाला व्यासपीठावर शाळेचे व्हिजीटर प्रमोद शिंदे, संस्थेचे आजीव सदस्य राजीव कुटे, नगरसेविका सुलभाताई उबाळे, मुख्याध्यापिका सौ. ज्योत्स्ना महाजन, पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. शारदा हागे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सुप्रिया पवार, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. पूनम वाघ यांच्यासह ए.बी.पी. न्यूज, लोक आधार न्यूज पेपर, ग्लोबल न्यूज, स्टार मझा न्यूज, ग्लोबल क्राईम न्यूज आणि R.T.I मुख्य संघटक नामदेव मेहेर हे मान्यवर उपस्थित होते.



यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी सर्व कार्यक्रमांचा आनंद लुटला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे आणि कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

आभार प्रदर्शन आणि सांगता
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेश कांबळे, वैशाली आटोळे, अपर्णा घोलप, भारती साळुंखे, रोहिणी माने, शितल गव्हाणे, दत्ता मोरे आणि विद्या शिंदे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. वैशाली ढाकणे यांच्या आभार प्रदर्शनाने आणि पसायदानाने झाली.



स्नेहसंमेलनाचा हा उत्साही सोहळा उपस्थितांनी मनमुराद अनुभवला आणि विद्यार्थ्यांच्या कलेला भरभरून दाद दिली.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!