रा.गे. शिंदे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव
प्रतिनिधी : डॉ. शहाजी चंदनशिवे
परंडा, दि. 3 जानेवारी 2024.रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्यान महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांनी दिले. आपल्या भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक सुधारणा चळवळीतले योगदान अधोरेखित केले.
डॉ. दीपा सावळे म्हणाल्या, “सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीत एक महत्त्वाचा स्तंभ आहेत. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी लढा दिला. महिलांचे शिक्षण आणि समानतेच्या हक्कासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील जाधव होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, युवती मंचच्या समन्वयक प्रा. शेख ए. एम., प्रा. सौ कीर्ती नलवडे, प्रा. सौ प्रतिभा माने, प्रा. सौ पी. जी. मोरवे, प्रा. ए. ए. खारे, प्रा. एस. एन. सातव, श्रीमती पल्लवी देशमुख, प्रा. रिया परदेशी आणि प्रा. स्नेहल कोकाटे उपस्थित होते.
जयंतीनिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साडी डे साजरा केला. विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत कार्यक्रमात सहभाग घेतला. कु. रिया शिंदे हिने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सुनील जाधव म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञानाच्या आधारे आपली ओळख निर्माण करावी आणि आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करावे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असून त्या संधींचा उपयोग करावा.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेख ए. एम. यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सौ. प्रतिभा माने यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. परविन मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी जीवनात प्रगती साधावी, हा कार्यक्रमाचा मुख्य संदेश होता.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.