स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शी, प्रतिनिधी दिनांक 2 जानेवारी 2025 परांडा रोड:
रिहाज दाऊद पठाण पत्रकार (स्टार माझा न्यूज) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत भरधाव वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही घटना परांडा रोडवरील नाईकवाडी प्लॉटजवळ घडली, जिथे रिंगरोडवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या मित्राला भरधाव टिपरचा धक्का लागल्याने. या अपघातात दोघेही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांची सायकलिंचे नुकसान झाले आहे.
विद्यार्थ्यांचा जीव मुठीत:
रिहाज पठाण यांचा मुलगा कैफ रियाज पठाण, जो बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयात इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे, सकाळी 9.30 च्या सुमारास शाळेत जात असताना ही घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून भरधाव वाहने चालकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
घातक भरधाव वाहने आणि प्रशासनाची दुर्लक्ष:
उपळाई रोड आणि परांडा रोडवरील भरधाव टिप्पर व गाड्या यामुळे अनेकदा अपघात होतात. टिप्पर मुरूम व खडी घेऊन जात असताना अत्यंत वेगाने वाहन चालवली जातात, ज्यामुळे या रस्त्यांवर चालणाऱ्या विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा जीव धोक्यात येतो. याआधीही येथे अनेक अपघात झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.
नागरिकांची मागणी:
या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी पालकांनी पुढील मागण्या केल्या आहेत:
भरधाव वाहन चालकांवर कठोर कारवाई: पोलिस प्रशासनाने तातडीने अशा चालकांवर कारवाई करावी.
गतीरोधक बसवणे: नगरपालिका प्रशासनाला वारंवार कळऊन देखील या रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात विलंब होत आहे तात्काळ गतिरोधक बसवावेत अशी मागणी होत आहे
वाहतूक नियमन: वाहतूक विभागाने या मार्गावर वाहतूक नियंत्रक नियुक्त करावा.
पोलिस प्रशासनाकडून अपेक्षा:
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बे लगाम वाहन चालकावर कठोर कारवाही करावी , नागरिकांच्या मागण्यांवर लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी होत आहे.
नागरिकांचा आक्रोश व संताप:
“शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.