5वी आणि 8वी अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा धोरण लागू: केंद्र सरकारचा निर्णय.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898




नवी दिल्ली : पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना आता वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास पुढील इयत्तेत ढकलले जाणार नाही. केंद्र सरकारने सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द करत फेरपरीक्षेची तरतूद केली आहे. शिक्षण मंत्रालयाने नुकतीच अधिसूचना जारी करत याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

फेरपरीक्षेची तरतूद
अधिसूचनेनुसार, जर विद्यार्थी आवश्यक निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरला, तर दोन महिन्यांत त्याला फेरपरीक्षेची संधी दिली जाईल. परंतु, या परीक्षेतही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात बसवावे. याशिवाय वर्गशिक्षकांनी पालक आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून विद्यार्थ्याला समजून घेण्यास मदत करावी आणि आवश्यक त्या मार्गदर्शनाची पूर्तता करावी.

राज्य सरकारांसाठी स्वतंत्र निर्णयाचा अधिकार
ही अधिसूचना केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील शाळांवर लागू होईल. यामध्ये केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळांचा समावेश असेल. मात्र, शिक्षण हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने, प्रत्येक राज्य सरकारने आपापल्या स्तरावर या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे.

महाराष्ट्रातील अंमलबजावणी
महाराष्ट्र राज्य सरकारने हा नियम २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून लागू केला आहे. राज्यातील फेरपरीक्षा एका महिन्यात घेतली जात होती. मात्र, केंद्राच्या निर्णयानुसार ती दोन महिन्यांनी घेणे अनिवार्य असेल.

महत्त्वाचे मुद्दे

पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी.
फेरपरीक्षेतही अपयश आल्यास त्याच वर्गात परत बसविण्याचा निर्णय.
वर्गशिक्षकांकडून अतिरिक्त मार्गदर्शन व विशेष शिक्षण पुरवले जाईल.
कोणत्याही विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढता येणार नाही.
शिक्षण अधिकार कायद्यातील सुधारणा
२०१९मध्ये शिक्षणहक्क कायद्यात अनुत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यासंबंधी सुधारणा करण्यात आली होती. नवे शैक्षणिक धोरण २०२३ लागू झाल्यानंतर शिक्षण मंत्रालयाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतल्याशिवाय त्यांना पुढे ढकलू नये, असा निर्णय घेतला.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!