स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शी, दि. 17 डिसेंबर: अंगद गोवर्धन बाराते धर्माधिकारी प्लॉट भागात आणखी एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. दिनांक 13 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान अंगद बराते हे बाहेरगावी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे टॉवरवरील पत्रे उचकटून घरात प्रवेश केला आणि कपडे व इतर सामान चोरी करून पसार झाले. या घटनेची तक्रार बार्शी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, बार्शी शहरात सातत्याने घडणाऱ्या चोर्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवडाभरापूर्वीच परंडा रोडवरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार घडला होता, त्यावर अद्याप पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नाही.
अंगद बाराते यांच्या घरातील चोरीची घटना हे चोरांनी पोलिसांसमोर दिलेले आणखी एक खुले आव्हान आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. चोरटे वारंवार सक्रिय राहत असताना त्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह:
वारंवार घडणाऱ्या चोर्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवणे, गुन्हेगारांचा माग काढणे आणि तपासाची गती वाढवणे आवश्यक आहे. मात्र, नागरिकांच्या मते, पोलिसांकडून या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसते.
नागरिकांच्या अपेक्षा:
गुन्हेगारांना पकडण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा बार्शीकर नागरिक करत आहेत. चोरीच्या घटनांमुळे शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून यावर लवकरात लवकर ठोस कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
– स्टार माझा न्यूज बार्शी प्रतिनिधी.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.