EVM ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआंदोलन सुरू.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.


परंडा, दिनांक: ५ डिसेंबर २०२४.

ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) विरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर जनआंदोलनाचा प्रारंभ केला आहे. या आंदोलनाची सुरुवात स्वाक्षरी मोहिमेद्वारे करण्यात आली असून, ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत राज्यभर मोहिम राबवली जाणार आहे.

पुण्यात रविवारी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी २००४ पासून ईव्हीएम विरोधात सातत्याने आवाज उठवत न्यायालयीन लढाई लढली आहे.

परंडा येथे स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ
परंडा शहरातील किल्लारोड मंडईपेठ येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ झाला. मोहिमेद्वारे मतदारांना ईव्हीएमच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदारसंघातील नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेतृत्वाने केले.

प्रमुख उपस्थिती
या वेळी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे, महासचिव राहुल पवार, विलास जाधव, रणधीर मिसाळ, प्रफुल चौतमहाल, अरुण सोनवणे, युवा अध्यक्ष रणवीर निकाळजे, फिरोज तांबाळी, अरीफ पठाण, धनंजय चौधरी, भाऊसाहेब सुभाष टकले यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनाची पुढील टप्पे
वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. ईव्हीएममधील त्रुटी आणि संभाव्य गैरप्रकार उघड करून जनतेला जागरूक करण्यासाठी पुढील काही आठवड्यांत विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

या आंदोलनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने मतदारांना आपला लोकशाही अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!