आवार पिंपरी, व शिरसाव येथे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या गावभेट दौर्‍यांना उत्स्फूर्त प्रतिसाद!

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

  • महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकर्‍यांना कर्जमाफी; मतदारसंघात १० हजार कोटींचा निधी आणणार – प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

परांडा प्रतिनिधी दिनांक 9                     भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या गावभेट दौर्‍यांना ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लाडक्या बहिणी, महिलावर्ग त्यांचे औक्षण करून त्यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभचिंतन करत आहेत. तर, महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर शेतकर्‍यांची कर्जमाफी करणार असून, पुढील पाच वर्षांत दहा हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणणार आहे. निवडून तर तुम्ही देणारच आहात, पण लाखोंच्या लीडने निवडून द्या, असे आवाहन याप्रसंगी प्रा. डॉ. सावंत यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.

आज मौजे आवार पिंपरी येथे पालकमंत्री सावंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की २०२२ ला आपण मंत्रीपद स्विकारले आणि तेव्हापासूच्या अडिच ते दोन वर्षांत मतदारसंघात जवळजवळ दोन हजार कोटी रूपयांचा निधी आणला आहे. निधीचे वाटप करताना विरोधकांच्या गावातदेखील दुजाभाव केला नाही, विरोधात असलेल्या गावातदेखील हा निधी दिला. तसेच, आरोग्यविषयक सेवा देताना आशिया खंडातील पहिला फिरता दवाखाना सुरु केला. त्याचबरोबर जिल्ह्यात एक हजार कोटींची रूग्णालयांची बांधकामे सुरू आहेत. लवकरच ती बांधकामे पूर्ण होणार आहेत. कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी केमोथेरेपी, रेडियशन सेंटर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उभारली आहेत, तर डायलेसिस सेंटर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी येणार्‍या काळात उभारणार असून, त्याची कामे येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहेत. आरोग्याबरोबरच शेतकर्‍यांच्या पाण्याचा प्रश्न आपण मिटवत आहोत, येत्या गुढीपाडव्याला ‘उजनी’चे पाणी सीना कोळेगावमध्ये येत आहे. त्यामुळे यापुढे सीना कोळेगाव धरण कधीच कोरडे पडणार नाही. आपण विकासकामे केली आहेत. परंतु आपण एवढ्यावरच थांबणार नसून, राहिलेली विकासकामे येणार्‍या पाच वर्षाच्या काळात आपणास करायची आहेत. आपला विजय निश्चित असून, आपणास नुसती लढाईच जिंकायची नाही तर, लीड घ्यायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील २८८ आमदारांत आपले नाव सर्वाधिक मताधिक्क्यांत आणण्याचे आवाहन प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी याप्रसंगी केले.


तर मौजे शिरसाव येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना प्रा. डॉ. तानाजी सावंत म्हणाले, की शिरसाव या गावात लक्ष्मीचे मंदीर आहे, त्यामुळे गावास लक्ष्मीचे वरदान आहे. त्यामुळे येथे विकास होणारच आणि आपण तो करणार आहोत. या ठिकाणी ‘शिवजलक्रांती’च्या माध्यमातून नदी रूंदीकरण केले आहे. त्याचा फायदा शेतकर्‍यांना होत आहे. आपल्या मतदारसंघात दोन हजार कोटी निधी आणला व विविध विकासकामासाठीचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आपल्या मतदारसंघास मिळवला आहे. अगोदर विरोधक लाडकी बहीण योजनेस विरोध करीत होते. आता ते म्हणतात, आमचे सरकार आल्यास पंधराशेचे तीन हजार रूपये करू. म्हणजे आम्ही सुरु केलेली लाडकी बहीण योजना चुकीची नव्हती, हे यावरून सिद्ध झाले आहे. आमचे महायुतीचे सरकार आल्यास शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करणार असून, येणार्‍या पाच वर्षात दहा हजार कोटीचा निधी मतदारसंघात आणणार आहोत. तो निधी आणण्यासाठी एकत्र येऊन काम करा, एक लाखाची लीड द्या, भरघोस मतदान करा, आणि विकासनिधी त्याच प्रमाणात मागा, मी द्यायला तयार आहे. आजचे शिरसाव व पुढील पाच वर्षाचे शिरसाव, यात किती बदल होते ते तुम्ही पहा. हा सर्कल मतदानाच्या बाबतीत एक नंबरचा असला पाहिजेत, विकाससुद्धा एक नंबरचा करणार आहे. असा शब्द देऊन लाखोच्या लीडने निवडून देण्याचे आवाहन प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी याप्रसंगी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा शिवसेनाप्रमुख दत्ता साळुंखे, अण्णासाहेब जाधव, वैद्यकीय मदत तालुकाप्रमुख बालाजी नेटके, तालुका उपप्रमुख शुक्रा ढोरे, अनाळ्याचे सरपंच कल्याण शिंदे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सारिका अंधारे, परांडा महिला आघाडी शहरप्रमुख गंगाताई सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव अंधारे, शिवसेना संपर्कप्रमुख विजय नवले, सरपंच कुमार वायकोळे, जामगावचे सरपंच लक्ष्मण मोरे, भागवत डाकवाले, संतोष डाकवाले, प्रमोद लिमकर, अप्पा देवकते, पोपट चोबे, समाधान चोबे, पंगतराव जाधव, पांडुरंग चौघे आदीसह महिला, पुरूष, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!