मा मंत्री तानाजी सावंत विरुद्ध मा.आ राहुल मोटे: परंडा निवडणुकीत थेट लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

परांडा प्रतिनिधी – परंडा विधानसभा निवडणुकीत या वेळी दुरंगी सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले. त्यामुळे मुख्य लढत महायुतीचे डॉ. तानाजी जयवंत सावंत (शिवसेना शिंदे गट) आणि महाविकास आघाडीचे राहुल मोटे (राष्ट्रवादी शरद पवार गट) यांच्यात होणार आहे.

या मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ३,३०,४०२ मतदारांसह हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरतो आहे. विशेषतः, रणजीत पाटील यांनी माघार घेतल्यामुळे, त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी तन-मनाने काम करणार का, याकडे तालुक्याचे लक्ष आहे. यासोबतच, निवडणुकीत उभ्या अपक्ष उमेदवारांचा प्रभाव कितपत असेल, याकडेही महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दाही मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांनी उमेदवार माघार घेण्याचा सल्ला दिला होता, ज्याचा परंडा मतदारसंघातील निवडणुकीवर थेट परिणाम दिसून आला आहे. मराठा आरक्षणासाठी चालवलेल्या आंदोलनामुळे जरांगे पाटील हे मराठा समाजात लोकप्रिय झाले आहेत, आणि त्यांचा राजकीय प्रभाव या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, जरांगे पाटील यांचा मतदारांवर असलेला प्रभाव महाविकास आघाडीच्या उमेदवार राहुल मोटे यांना लाभू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची एकजूट वाढली असून, त्यांच्या मतांची मते कोणत्या बाजूला वळतात, यावर निकालाचा थेट परिणाम होईल. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंत हे सत्ताधारी महायुतीचे उमेदवार असल्याने, मराठा समाजाचा रोष आणि जरांगे पाटील यांच्या समर्थनाचाअभाव जड जाऊ शकत का?

अपक्ष उमेदवारांचा आणि इतर लहान पक्षांचा देखील परंडा मतदारसंघात प्रभाव आहे, परंतु जरांगे पाटील यांचा फॅक्टर कोणत्या उमेदवाराला अधिक फायदा करतो, हे निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकणारे ठरेल.

परंडा मतदारसंघात लढत करणाऱ्या इतर २१ उमेदवारांमध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधी, अपक्ष उमेदवार, आणि सामाजिक कार्यकर्तेही आहेत. प्रमुख पक्षांसोबत अपक्ष उमेदवार या निवडणुकीत आपला वर्चस्व सिद्ध करू शकतात का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांची यादी:

डॉ. तानाजी जयवंत सावंत (शिवसेना शिंदे गट)
महादेव लोखंडे (बसपा)
राजेंद्र गफाट (मनसे)
राहुल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)
प्रविण रणबागुल (वंचित बहुजन आघाडी)
ॲड. रेवण भोसले (समाजवादी पार्टी)
राहुल घुले (रासप)
आर्यन शिंदे (अपक्ष)
शराजन शेख (अपक्ष)
अरुण जाधवर (अपक्ष)
दिनेश मांगले (अपक्ष)
नुरजा शेख (अपक्ष)
बंडु पौळ
विनयराज देशमुख
असिक जमादार
लक्ष्मीकांत आटुळे
गुरुदास कांबळे
सोमनाथ कदम
जामिलखाँ पठाण
राहुल रामहारी मोटे
संभाजी शिंदे
परंडा विधानसभा निवडणुकीचा निकाल काय येतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असेल.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!