बोगस रेशन कार्ड संदर्भात शासनाच्या लेखी आश्वासनांतर बेमुदत आंदोलन स्थगीत.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
( तहसीलदार निलेश काकडे व पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मादर्शनाखाली उपोषण स्थगित )
परंडा प्रतिनिधी
परंडा दि २० ऑक्टोबर २०२४ . डोमगांव ता परंडा येथील बोगस रेशनकार्ड वाटपाचे रॅकेट करून, शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेऊन चुकीचा लाभ ऊठवले बाबत सर्वसंधीतावर कायदेशीर गुन्हे नोंद करून शासकीय रकमेची वसुली करणे बाबतची कार्यवाही होणे बाबात दिनांक १५आक्टोंबर २०२४ रोजी दिपक गायकवाड , अनिल गायकवाड , लक्ष्मण गायकवाड आणि माधव दाभाडे यांनी तहसील कार्यालयासमोर धरण्यात आलेले अमरण उपोषण तहसीलदार परंडा यांचे उपोषण कर्त्यांच्या मागणीनुसार कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासनानंतर आज दिनांक २० आक्टोंबर २०२४ रोजी, उपोषण कर्ते श्री दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, लक्ष्मण गायकवाड व माधव दाभाडे यांनी तहसीलदार परंडा यांचे प्रतिनिधी पुरवठा नायब तहसीलदार श्री मिलींद पराळे यांचे हस्ते पाणी, चहा, ज्युस घेऊन आजचे उपोषण स्थगीत करण्यात आले .
यावेळी तहसीलदार निलेश काकडे यांनी लेखी पत्र दिले . त्या पत्रामध्ये नमुद केले आहे की सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे . सदरील प्रकरणात आदर्श आचार संहिता कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल . कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण उपोषण मागे घ्यावे . या लेखी आश्वासनानंतर दिपक गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी चालु असलेले उपोषण मागे घेतले .
यावेळी, कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा येथील संचालक विजय दादा बनसोडे, फुले आंबेडकर विव्दत सभा महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे, माजी सरपंच मनोहर मिस्कीन, तानाजी पाटील, पोलीस हवालदार बळीराम शिंदे, पोलीस अंमलदार भुजंग अडसूळ, अशीष ठाकूर, सोमनाथ मिस्कीन, महादेव खरात,हवालदार गायकवाड, ई. उपस्थित होते .

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!