पाणी व वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज  – डॉ सचिन चव्हाण

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने./डॉ शहाजी चंदनशिवे
(रा गे शिंदे महाविद्यालयात ग्रीन क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन)

प्रतिनिधी
परांडा दि. 18 ऑक्टोबर 2024 पाणी व वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे ते सर्वांनी करावे असे प्रतिपादन ग्रीन क्लबचे जिल्हा मास्टर ट्रेनर डॉक्टर सचिन चव्हाण यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या ग्रीन क्लब कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.  येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयामध्ये विद्यापीठ व युनिसेफ, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  व सहसंचालक उच्च शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन क्लब ची स्थापना करण्यात आलेली आहे .ग्रीन क्लब च्या अंतर्गत वृक्षारोपण पाणी संवर्धन पोस्ट सादरीकरण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ विशाल जाधव यांनी आयोजित केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ महेश कुमार माने उपस्थित होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून ग्रीन क्लबचे जिल्हा मास्टर ट्रेनर डॉ सचिन चव्हाण हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेश कुमार  माने सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे प्रमुख व्याख्याते डॉ सचिन चव्हाण वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संभाजी गाते व ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ विशाल जाधव उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ विभागातील कला वाणिज्य व विज्ञान विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     याप्रसंगी  सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वाय वेस्ट ॲप वर लॉगिन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाणी संवर्धन कसे करावे या संदर्भात अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले प्रास्ताविक डॉ विशाल जाधव यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ अमर गोरे पाटील यांनी मानले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!