बेशुद्ध युवकाला नवजीवन: भगवंत सेना दलाची मानवतावादी भूमिका.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898


बार्शी प्रतिनिधी दिनांक 21: गेल्या वर्षभर बार्शी शहर आणि परिसरात नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा इतर अडचणीत सापडलेल्या 30 हून अधिक व्यक्तींचे प्राण वाचवून भगवंत सेना दलने मानवतावादाला जिवंत ठेवले आहे. ‘जनहिताय, जनरक्षणाय’ या ब्रीदध्वनीखाली कार्यरत असलेले हे दल, अनाथ, बेवारस आणि अपघातग्रस्त नागरिकांसाठी सदैव सज्ज असते.

सहा तासांनी बेशुद्ध युवकाला नवजीवन:

याच पंक्तीतील एका उल्लेखनीय घटनेत, रविवारी सायंकाळी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय पाटील यांनी भगवंत मैदानावर एका युवकास दुपारपासून बेशुद्ध आणि जखमी अवस्थेत पडलेले पाहिले. त्यांनी तातकाळ भगवंत सेना दलाचे अध्यक्ष धीरज शेळके यांना याबाबत कळवले. सेनेचे सदस्य रणजीत देशमुख आणि दीपेश भराडिया घटनास्थळी पोहोचून जखमी युवकास 108 रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.



नागरिकांची उदासीनता, सेनेची सक्रियता:

या घटनास्थळी अनेक नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेत होते. पण भगवंत सेनेच्या सदस्यांनी आपली जबाबदारी ओळखून युवकाच्या जीवनासाठी धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर लाड यांच्या पथकाने युवकावर तातकाळ उपचार करून त्याला पुन्हा नवजीवन दिले. अर्ध्या तासात युवक शुद्धीवर आला आणि तो टिळक चौक येथील असल्याचे निष्पन्न झाले.

बार्शी पोलिसांचे सहकार्य:

या संपूर्ण घटनेची माहिती बार्शी पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांना देण्यात आली. त्यांनी देखील तात्काळ आपली पोलिस यंत्रणा कामाला लावून ग्रामीण रुग्णालयात एक पथक पाठवले.

नातेवाइकांशी संपर्क:

भगवंत सेना दलाच्या अध्यक्ष धीरज शेळके यांनी युवकाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली.

कौतुक आणि आवाहन:

या मोहिमेत भगवंत सेना दलाचे रणजीत देशमुख, दीपेश भराडिया आणि छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. बार्शी शहर आणि तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 9922914009 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन धीरज शेळके यांनी केले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!