मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-२ सन २०२४-२५, बार्शीतील महाराष्ट्र विद्यालय पुणे विभागात तृतीय

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898


बार्शी प्रतिनिधी.
सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी जमशेद भाभा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस,एनसीपीए मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई या ठिकाणी हा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री श्री दिपक केसरकर, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग आय.ए.कुंदन,शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, संस्थेचे विश्वस्त निवृत्त आयएएस अधिकारी दिनकर जगदाळे, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी. धावणे,उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी,प्रकाश मोहिते,के.जी.मदने, महेश माने,मनोज मिरगणे,सचिन देशमुख,विजय अनभुले उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २” हे अभियान दि.५ ऑगस्ट २०२४ ते दि.०६ सप्टेंबर २०२४ या कालावधी दरम्यान शाळेमध्ये राबविण्यात आले होते. या उपक्रमास शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९१ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमुख घटकांवर आधारीत एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते.
त्यानुसार महाराष्ट्र विद्यालय बार्शी या शाळेचे प्रत्येक स्तरावर समित्यांकडून काटेकोरपणे मूल्यमापन करून या अभियानाच्या दुसऱ्या टप्यात पुणे विभागीय स्तरावर शाळेस तृतीय क्रमांक देण्यात आला.
या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे अध्यक्ष मा.डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री.ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य  श्रीमती डॉ मिराताई यादव,श्री.एस. बी.शेळवणे ,सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य तसेच जिल्हा परिषद पुणे मुख्याधिकारी संतोष पाटील,उपसंचालक पुणे राजेंद्र अहिरे,जिल्हा परिषद सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप,उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे रावसाहेब मिरगणे, बार्शी गट शिक्षणाधिकारी सुहास गुरव, बार्शी न.पा.चे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री.एस.सी. महामुनी,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!