स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शी – मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून महाराष्ट्र विद्यालय बार्शी या ठिकाणी साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे व भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे पर्यवेक्षक एस.सी. महामुनी व पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक ए.एन.कसबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी नेहमी वाचन केले पाहिजे.वाचनाने आपले ज्ञान वाढते व बुद्धी तल्लख होते तसेच आज १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आरोग्यासाठी हात धुण्याचे महत्व व हात धुण्याची योग्य पद्धत याविषयीही देखील मार्गदर्शन केले.
यादिवशी रोज प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पुस्तकांचे वाचन केले.
याप्रसंगी जेष्ठ शिक्षक शशिकांत लांडगे ,ए. एन. कसबे, जे. एम. तांबोळी , ग्रंथपाल मनोज मिरगणे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.