गार भवानी मंदिर, शिक्षक सोसायटी येथे दसरा सिमोल्लंघन मोठ्या उत्साहाने साजरा..

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.



भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते गार भवानी, शिक्षक सोसायटी येथील भवानी मातेची आरती करून दसरा सिमोल्लंघन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

     यानंतर भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल शिक्षक सोसायटी च्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
     यावेळी दिपक (दादा) थोरबोले, उमाकांत गोरे, गजानन तिवारी, उमेश थोरबोले, मुसळे आप्पा, रमेश थोरबोले, मनोहर पवार, धनंजय काळे तसेच शिक्षण सोसायटी येथील जेष्ठ मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!