स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा, दिनांक 12 ऑक्टोबर 2024: परंडा येथील विश्रामगृहात डीबीए समूहाच्या वतीने 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात परंडा आणि आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने बौद्ध भाऊ-बहिणींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन माननीय दयानंद बनसोडे (डीबीए समूह संस्थापक अध्यक्ष), मा. राहुल बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष), एडवोकेट दयानंद धेंडे, राजाभाऊ शिंदे (जिल्हाध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल म.रा.), अतुल सोनवणे (तालुकाध्यक्ष), दिलीप परिहार (पोलीस पाटील खानापूर) आणि महावीर बनसोडे (बौद्धाचार्य) या मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर उपस्थित सर्वजणांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विशद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रेरणादायी जीवन आणि त्यांच्या योगदानाची स्मरणार्थ या दिवसाची साजरी केली जाते, असे मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमात कांताबाई गायकवाड (महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल), घनश्याम शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस), शिराज पठाण (खजिनदार), नितीन शिंदे (सचिव), अध्यक्ष संभाजी थोरात, भाऊराव पेठे, विष्णू झोंबाडे, रवी बनसोडे, अमोल बनसोडे, सम्यक धेंडे, सूर्योदय सरवदे, दत्तात्रय पाटील लोहारा, अरुण बनसोडे इत्यादींसह मोठ्या संख्येने नागरिक, महिला वर्ग आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी माननीय दयानंद बनसोडे यांनी उपस्थित सर्वजणांचे आभार मानत कार्यक्रमास यशस्वी करण्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.