भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन.

Picture of starmazanews

starmazanews

परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परांडा दिनांक_ – भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे निधन झाले असून त्यांनी रात्री १०.२७ मि. आखेरचा श्वास घेतला.   त्यांचे पार्थिव सकाळी  १० ते १२ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात आले होते व दु १ वा.  भोत्रा रोडच्या शेतामध्ये त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी खा.ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील,
आ.राजाभाऊ राऊत, बार्शी श्री.दादा साठे, माढा, श्री.धर्मराज महाराज सामगावकर श्री.खा.रवींद्र गायकवाड, उमरगा
श्री.दादासाहेब खरसडे, श्री. शिवाजीराव सावंत, श्री दिलीप सोपल, बार्शी , श्री. बाळासाहेब हांडोग्रिकर, श्री.शंकरराव बोरकर
आ.राहुल मोटे, आ.विक्रम काळे, हे उपस्थित होते. 
      कट्टर, कडवट व एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्ञानेश्वर तात्या पाटील यांची महाराष्ट्रभर ओळख होती. 
ग्रामीण भागात त्याचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग होता. मागील काही दिवसांपासून ते दीर्घ आजारामुळे पुणे येथे उपचार घेत होते त्यांनी आजारी असताना देखील शिंदे गटाला सहकारी सोसोयाटी व कृषी उत्पन्न बाजार समितीवर भगवा फडकवत एकतर्फी पराभूत करत विजय नोंदविला होता. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या  विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा तालुक्यात सुरु होती.
   
*ज्ञानेश्वर पाटील यांची राजकीय कारकीर्द*
ज्ञानेश्वर वसंतराव पाटील यांचा जन्म १९६७ साली धाराशिव जिल्ह्यातील परांड्यात झाला. मराठा समाजात जन्माला आलेल्या पाटील यांचे शिक्षण जास्त झाले नसल्यामुळे  सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. अशा परिस्थितीत त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केले होते.


मा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांशी प्रेरित होऊन, पहिल्यांदा त्यांनी  बिनविरोध नगरसेवक पद भूषविले होते. त्यानंतर पाटील यांना मा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अवघ्या २५ वर्षी विधानसभेचे तिकीट दिले होते व त्यावेळी सगळ्यात कमी वयाचे आमदार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. विधानसभेच्या जागेवर पहिल्यांदाच १९९५ साली भगवा फडकवला होता राजकारणात एक एक पायरी वर चढत असताना त्यांनी १९९९ साली सलग दुसऱ्यांदा  विधानसभेवर विजय नोंदविला. त्याच वेळेस त्यांनी कुटूंबाची बाजू समर्थपणे सांभाळली. ज्ञानेश्वर पाटील यांना आई,पत्नी, तीन मुले व एक मुलगी, पुतण्या पुतणी, भवजाई आहे. मोठे चिरंजीव रणजित पाटील हे  सध्या शिवसेना (उबाठा) धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. द्वितीय चिरंजीव विश्वजित आणि तिसरा पुत्र सत्यजीत व  मुलगी सिध्दी शिक्षण घेत आहेत. त्यांचे बंधू सिध्देश्वर पाटील जिल्हापरिषद सदस्य होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!