बार्शीत अपघातांची मालिका सुरूच, नागरिकांचा संताप,तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी.

Picture of starmazanews

starmazanews

बार्शीला अपघातांची मालिका, नागरिकांचा संताप, प्रशासनाने गंभीरतेने या गोष्टीकडे लक्ष देऊन गतिरोधक बसवावेत अशी मागणी.


स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

बार्शी: बार्शी शहरात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात सलग अपघातांच्या घटना घडत असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काल मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रात्री 9:30च्या सुमारास फुले मंगल कार्यालयाच्या जवळ स्विफ्ट गाडी क्रमांक. MH11 AW 8870 या नंबरच्या भरधाव कारच्या धडकेत एकविरा आई चौकातील घोलप यांच्या किराणा दुकानि काम करणारे   महेबूब हावरे  रा.परांडा रोड गांधी स्टॉप या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. गाडीचा मालक काकासाहेब राजेंद्र राऊत राहणार जवळा(नि) सध्या राहणार उपळे रोड बार्शी. या घटनेनंतर नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, या मोक्याच्या ठिकाणी गतिरोधक असते तर असा भयंकर अपघात टळला असता.

प्रशासनाकडे मागणी :-शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे जागोजागी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात उपळाई रोड वर भरधाव कार डिव्हायडरवर चढून गेल्याची घटना घडली होती. प्रशासनाने नव्याने काँक्रीटचे व डांबरी रस्ते बांधले आहेत विकास कामे झाली पाहिजेत त्याबरोबर नागरिकांच्या सुरक्षेचा पण विचार व्हयला पाहिजे , या रस्त्यांवर वाहने भरधाव वेगाने चालवली जात आहेत. नवीन झालेला 422 गाडेगाव रोड, उपळाई रोड, शिवाजी कॉलेज रोड  यासारख्या बार्शीतील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या वाढली आहे. त्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी बार्शीकर  नागरिक करीत आहेत.

दररोज हजारो विद्यार्थ्यांची  ये जा :-शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिकत असतात सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा सायकलवर प्रवास होत आहे . या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांची मागणी आहे की, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन शहरातील विविध भागात गतिरोधक बसवण्याची व्यवस्था करावी.

संपादकीय  :- बार्शी शहरातील वाढती अपघातांची संख्या ही गंभीर समस्या आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी गतिरोधक बसवणे, वाहतूक नियमांचे कडकपणे पालन करणे आणि वाहनचालकांमध्ये सुरक्षेची जागरूकता निर्माण करणे ही काही महत्त्वाची पावले आहेत.

हेही वाचा:

बार्शीत अपघातांचा वाढता धोका
नागरिकांची प्रशासनाकडे मागणी
गतिरोधकांची गरज

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!