महाराष्ट्र विद्यालयातील खेळाडूंची पुणे विभागीय शालेय बुद्धिबळ व स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

बार्शी प्रतिनिधी दिनांक.
दि. १० व ११ सप्टेंबर २०२४ रोजी क्रीडा संकुल , कुमठा नाका सोलापूर येथे  १४/१७/१९ वयोगटातील मुले व मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील 330 खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाच्या वयोगट १४ मुली मध्ये प्रथम क्रमांक कु सान्वी गोरे ,वयोगट १७ मुलांमध्ये चौथा  क्रमांक चि प्रज्ज्वल शिंदे व वयोगट १९ मुले प्रथम क्रमांक चि प्रसन्न जगदाळे या  एकूण ३ खेळाडूंची विभागीयस्तरासाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून श्री.अतुल नलगे यांनी काम पाहिले.
तसेच शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग  स्पर्धेमध्ये  प्रथम क्रमांक हर्ष बेणारे, द्वितीय क्रमांक रेणुका गायकवाड  व  तृतीय  क्रमांक लकी पायघन या ३ खेळाडूंनी यश मिळवत  विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री.पी.डी पाटील, श्री.योगेश उपळकर, श्री.विकास पाटील यांचे  मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री.सचिन जगताप यांनी विशेष अभिनंदन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री.ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. व्ही.एस.पाटील, श्री.बी.के.भालके ,सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री.एस.सी. महामुनी,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!