छत्रपती संभाजीनगर येथील संविधान जागर साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरणार –  डॉ शहाजी चंदनशिवे .

Picture of starmazanews

starmazanews


(फुले आंबेडकर विद्वत सभा छ संभाजीनगर ( मराठवाडा )च्या वतीने संविधान जागर साहित्य संमेलन 2024 चे भव्य आयोजन .
ॲड . प्रकाश आंबेडकर प्रमूख मार्गदर्शक तर
प्रा अंजलीताई आंबेडकर उद्घाटक म्हणुन उपस्थित राहणार )

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

प्रतिनिधी
मराठवाडा दि . 19 सप्टेंबर 2024 फुले आंबेडकर विव्दत सभा छ . संभाजीनगर (औरंगाबाद )च्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी फुले आंबेडकर विद्वत सभा आयोजित संविधान जागर साहित्य संमेलन 2024 चे आयोजन छ . संभाजीनगर येथे करण्यात आले आहे .
            या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर तर उद्घाटक म्हणून फुले आंबेडकर विव्दत सभेच्या मार्गदर्शिका प्रा . अंजलीताई आंबेडकर या उपस्थित राहणार आहेत . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत ॲड . शाम तांगडे तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ . प्रमोद दुधडे हे उपस्थित राहणार आहेत .फुले आंबेडकर विद्वत सभेचे मार्गदर्शक  भास्कर भोजने  या साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक करणार आहेत .या संविधान जागर साहित्य संमेलनाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा डॉ शहाजी , प्रा डॉ मनोज निकाळजे व प्रा डॉ विनोद उपर्वट त्याचबरोबर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी , संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. धनंजय , कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अशोक येरेकर व बौद्धाचार्य व्ही .के . वाघ यांची उपस्थिती असणार आहे . या साहित्य संमेलनाचे मुख्य निमंत्रक मराठवाडा विभागीय समन्वयक डॉ प्रज्ञा , प्राचार्य डॉ संजय , प्रा भारत शिरसाठ व रतन कुमार साळवे यांची उपस्थिती असणार आहे . या प्रसंगी संविधान सन्मान  रॅलीचे आयोजन सकाळी ठीक आठ वाजता क्रांती चौक ते संत एकनाथ  रंगमंदिर या दरम्यान करण्यात आले आहे .
     सकाळी ठीक दहा वाजता प्रा . अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे . दुपारी ठीक बारा वाजता एससी एसटी वर्गीकरण आणि क्रिमिलियर सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षण संबंधी निकाल अन्वयार्थ – भूमिका या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे . या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून अर्थतज्ञ प्राचार्य डॉ इंद्रजीत अल्टे तर वक्ते म्हणून माजी न्यायाधीश अनिल वैद्य व आय एल एस लॉ कॉलेज पुणे येथील डॉ नितीश नवसागरे हे उपस्थित राहणार आहेत . सायंकाळी चार वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवयित्री प्रतिभा अहिरे तर या कवी संमेलनामध्ये देवानंद , यशवंत , धोंडोपंत , सुनील उबाळे व मधुकर दिवेकर हे आपल्या कविता सादर करणार . सायंकाळी ठीक पाच वाजता समारोप समारोह कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत . यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँकेचे अध्यक्ष पी बी अंभोरे तर मिलिंद महाविद्यालय ( औरंगाबाद ) छ . संभाजी नगर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम ए वाहुळ यांची उपस्थिती असणार आहे . यावेळी  ज्येष्ठ विचारवंत डॉ आर के क्षीरसागर आणि उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथील ॲड . एस आर बोधडे उपस्थित राहणार आहेत . या संविधान जागर साहित्य संमेलनामध्ये फुले  आंबेडकर विद्वत सभेच्या सर्व जिल्हा  मराठवाडा तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्वच समन्वयकांनी उपस्थित रहावे .महाराष्ट्र राज्यातील सर्व संविधान प्रेमींनी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे सर्व विचारवंतांनी या संविधान जागर साहित्य संमेलनाचा भाग व्हावा व लाखोच्या संख्येने या संविधान सन्मान रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले आहे . या संविधान जागर साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक डॉ प्रज्ञा , प्राचार्य डॉ संजय , प्रा भारत शिरसाट आणि रतनकुमार साळवे संविधान जागर साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत .
  हे संविधान जागर साहित्य संमेलन रविवार दि . २९ सप्टेंबर २०२४ रोजी   सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संत एकनाथ रंगमंदिर न्यू उस्मानपुरा छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे .

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!