स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा : शहरातील आजोबा गणपती परंड्याचा महाराजा म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या बालवीर गणेश मंडळ व सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने राजापुरा गल्ली येथे रविवारी ( ८ सप्टेंबर) आयोजित रक्तदान शिबीराप्रसंगी ४१ गणेशभक्तांनी रक्तदान करून सामाजीक बांधीलकी जोपासली.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन परंडा पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या हस्ते प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, परंडा माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, उद्योजक तुकाराम (काका) साळुंके, सुरेशसिंह सद्दीवाल, पो.हे.कॉ. नितीन गुंडाळे, श्री भवानी शंकर मंदिराचे विश्वस्त किशोर महाराज बैरागी, मधुकर लोखंडे, प्रशांत मिश्रा, नरेश दिक्षीत, संजय कानाडे, किरणसिंह ठाकूर, प्रविण मिश्रा, गोरख देशमाने, मदनसिंह सद्दीवाल, संकेतसिंह ठाकूर, मदन दिक्षीत, समरजितसिंह ठाकूर, ॲड पृथ्वीराजसिंह सद्दीवाल, धिरजसिंह ठाकूर, अमरसिंह ठाकूर, अशुतोष तिवारी, शुभमसिंह ठाकूर, अमितसिंह सद्दीवाल, व्यंकटेश दिक्षीत, आदर्शसिंह ठाकूर, किरण पांडे, विलास मदने आदीसह मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबीरात रक्तदान करणाऱ्या सर्व गणेशभक्तांना बालवीर गणेश मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र व भिंतीवरील घड्याळ भेट म्हणुन देण्यात आले. रक्त संकलन करण्यासाठी सोलापुर येथील मल्लिकार्जुन ब्लड बँकेचे प्रकाश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अमीर मुजावर, ओम घाडगे, नंदिनी मस्के, राणी शिंगे, संस्कृती वडवे यांनी सहकार्य कार्य केले. सदर शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संकेत शुक्ला, उपाध्यक्ष सुरजसिंह ठाकूर, खजिनदार राज वळसंगकर व पावन मिश्रा, सचिव तुषार पांडे, सहसचिव विश्वजित ठाकूर, आयुषसिंह सद्दीवाल तसेच पारस मिश्रा, अजय पांडे, कार्तीक दीक्षित आदी पदाधिकारी कार्यकर्ते उस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.