स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
प्रतिनिधी परंडा दि . 5 सप्टेंबर 2024 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी शेख तौफिक अमीर याची नुकतीच ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती झाल्याने त्याचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी प्रा डॉ शहाजी चंदनशिवे व कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख उपस्थित होते .
दि . 3 एप्रिल 2024 रोजी से शेख तौफिक अमीर याने पोलीस पदासाठी परीक्षा दिली होती त्याचा निकाल 18 ऑगस्ट रोजी लागला व त्यास आत्ता ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती देण्यात आली आहे . महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक यांनी त्याचे अभिनंदन करत त्याचे कौतुक ही केले .कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते .
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898