महाराष्ट्र विद्यालयातील खेळाडूंची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


बार्शी प्रतिनिधी,दिनांक १७ व १८ ऑगस्ट २०२४ वार  शनिवार व रविवार रोजी क्रीडा संकुलन सोलापूर येथे १४,१७ व १९ वयोगटातील मुले व मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धांमध्ये जिल्ह्यातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाच्या वयोगट १४ मुली मध्ये कु सानवी गोरे व कु शरयू ठोंगे,वयोगट १९ मुलींमध्ये कु संस्कृती पोतदार व १९ मुलांमध्ये चि आदित्य लटके या सर्व खेळाडूंनी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत यश संपादन केले. या सर्व खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झालेली आहे.
या स्पर्धेसाठी  सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक पी.डी पाटील, योगेश उपळकर व विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री.ए.पी.देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. व्ही.एस.पाटील, बी.के. भालके सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे,उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री.एस.सी.महामुनी,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!