महाराष्ट्र विद्यालयातील खेळाडूंची विभागीय शालेय फुटबॉल व वुशू स्पर्धेसाठी निवड

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


बार्शी प्रतिनिधी .२५ ऑगस्ट २०२४ वार रविवार रोजी  १४ वयोगटातील मुलांच्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धाचे आयोजन वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर येथे करण्यात आले होते.
सदर स्पर्धांमध्ये जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवत महाराष्ट्र विद्यालय बार्शी च्या संघाची विभागीय स्तरासाठी निवड झाली. संघातील खेळाडू पुढील प्रमाणे देशपांडे गणेश,ओजस डूरे, प्रसाद  काशीद,राजवीर ,शिनगारे सोहम,  पायघन ,गोविंदराज सावळे, क्षितिज घोडेराव, सार्थक  शिंदे, अथर्व गाडेकर, प्रथमेश पवार ,विराज जिरंगे , सोहम  गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे ,सार्थक मोहिते ,अलोक शेळके,आर्यन शिनगारे व आर्यन जाधव तसेच  जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय बार्शी ची खेळाडू कु तनिष्का काकासाहेब गुंड हीने ६१ ते ६५ वजनीगटात प्रथम क्रमांक मिळवत तिची देखील विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. या स्पर्धा पंढरपूर येथे पार पडल्या.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक पी.डी पाटील, योगेश उपळकर व विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री.ए.पी.देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. व्ही.एस.पाटील, बी.के. भालके सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे,उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री.एस.सी.महामुनी,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Recent Posts
error: Content is protected !!