स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898. बार्शी प्रतिनिधि दिनांक 19
रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या आसाम सीमेवरली मेजर उमेश मोरे यांच्या रेजिमेंटला पाठविल्या. त्या सर्व राख्या त्यांना पोच झाल्या. समाजाचे आपण काहीतरी देणं असतो या उक्तीप्रमाणे स्व-कौशल्य जागृत करून अप्रतिम राख्या तयार केल्या.या विद्यार्थ्यांना राखी बनवण्यासाठी श्रीमती सुहासिनी शिंदे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच राखी मिळताच मेजर उमेश मोरे यांनी एक राखी सैनिक भावासाठी या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल महाराष्ट्र विद्यालयाचे मनापासून धन्यवाद मानले.
भारतीय संस्कृतीमधील प्रेमळ,अतूट, पवित्र बहीण भावांचे नाते सुरक्षेच्या बंधनात बांधणारे सन व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सैन्य व पोलीस दलामधे घरापासून दूर कर्तव्य बजावणाऱ्या भावंडानसाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी अवस्मरीन सुंदर असा उपक्रम केला.सर्व जवानांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या सुंदर अशा उपक्रमाचे आयोजन केल्या बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे यांनी श्रीमती सुहासिनी शिंदे व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.