हनुमंत गायकवाड यांची परंडा विधानसभा युवक अध्यक्षपदी निवड.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा दिनांक 16,ऑगस्ट 2024                                                 परंडा तालुक्यातील पिंपळवाडी गावचे माजी सरपंच तथा सलग तीन वेळेस ग्रामपंचायत सदस्य राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते हनुमंत गायकवाड यांची परंडा तालुका विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी आमदार राहुल भैया मोटे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख परंडा तालुक्यातील पिंपळवाडी गावचे रहिवासी असून पिंपळवाडी गावचे सरपंच ते सलग तीन वेळेस ग्राम पंचायत सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.


सरपंच पदाच्या काळामध्ये आपल्या ग्रामपंचायतला शासन स्तराज्यस्तरावरील जिल्हा परिषद स्तरावरील वेगवेगळे पुरस्कार प्राप्त करून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता सर्वसामान्य जनतेशी नाळ असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परंडा तालुक्यातील एक कर्तुत्व नेतृत्व आणि वक्तृत्ववान युवानेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.


माजी आमदार राहुल भैया मोटे व वैशालीताई मोटे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटात एक वेगळीच ओळख आहे, त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून माजी आमदार राहुल भैया मोटे यांनी त्यांची परंडा विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या परंडा विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे नियुक्तीचे पत्र काल शिवस्वराज्य यात्रेत डॉक्टर अमोल कोल्हे, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले….

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!