स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
( प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण .
– अकॅडमी चा विद्यार्थी कृष्णा पोपळे याचा पुणे येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाल्याने सत्कार )
प्रतिनिधी परंडा .
दिनांक १५ ऑगस्ट २०२४ .स्वातंत्र्य दिन केवळ ऐतिहासिक घटना नसून तो आपल्या मनात देशप्रेमाची भावना जागवतो असे प्रतिपादन फुले शाहू आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी क्रांती करिअर अकॅडमी परंडा येथे आयोजित केलेल्या 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनानिमित्त आपल्या व्याख्यानामध्ये व्यक्त केले .ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी क्रांति करीअर अकॅडमीचे संस्थापक श्री पांडुरंग कोकणे व फिजिकल ट्रेनर दीपक ओव्हाळ नागनाथ कोकणे महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक विभुते यांची उपस्थिती होती .यावेळी अकॅडमी चा विद्यार्थी कृष्णा पोपळे याची नुकतीच पुणे येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाल्याने त्याचा डॉ शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना डॉ शहाजी चंदनशिवे म्हणाले की भारताचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांच्या हृदयातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे याच दिवशी 1947 साली भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळवली हा दिवस केवळ स्वातंत्र्याचा उत्सव नसून तो आपल्या देशाच्या शौर्य बलिदान आणि संघर्षाची आठवण करून देतो .इंग्रजी कार्यकर्त्यांनी भारतीयांना अनेक प्रकारच्या अन्याय आणि अत्याचारांचा सामना करायला लावला भारतीय जनता ब्रिटिश राजवटीच्या विरोधात उठली आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली .डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग अशा अनेक नेतृत्वाने भारताच्या मनात स्वतंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली . स्वातंत्र्य दिन हा केवळ ऐतिहासिक घटना नसून तो आपल्या मनात देश प्रेमाचे भावना जागवतो हा दिवस आपल्याला आपल्या महान नेतृत्वाची शूरवीरांची आणि क्रांतिकारकांची आठवण करून देतो त्यांच्या बलिदानामुळे आपण आज स्वातंत्र्याने श्वास घेऊ शकतो . हा दिवस आपण आपल्या देशाचा विकासासाठी समाजाच्या प्रगतीसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले .पुढे बोलताना ते म्हणाले की ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी भारतीयांना तुमची स्वतःची घटना तयार करा असा आदेश दिला आणि ती घटना तयार करण्याची जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि या देशाच्या घटनेवर आज संपूर्ण भारत देश स्वतंत्रपणे जीवन जगत आहे . .
यावेळी करिअर अकॅडमी मध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले की तुम्ही देश सेवा करण्यासाठी तुम्ही हे प्रशिक्षण घेत आहात तेव्हा प्रामाणिकपणे आपण आपल्या देशासाठी अभ्यास करून प्रशिक्षण घेऊन आपले जीवन यशस्वी करावे .याप्रसंगी संचालक पांडुरंग कोकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतांमध्ये क्रांतिकारी अकॅडमी चा वृत्तांत नमूद केला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन फिजिकल ट्रेनर दीपक ओवाळ यांनी केलेतर आभार पांडुरंग कोकणे यांनी मानले यावेळी अकॅडमी चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.