स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा दिनांक 6/08/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या पालक सभेमध्ये शैक्षणिक वर्ष 24-25 व 25 26 वर्षासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.
सदर पालक मेळाव्यास जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव अंकुश सर निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
प्रथमता सर्वांचे स्वागत करून शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र कापसे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.. निरीक्षक श्री जाधव सर यांनी पालकांना सखोल मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीची रचना अधिकार व कार्य याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर प्रथम सर्व पालकांच्या चर्चेतून सदस्यांची निवड केली. सर्व सदस्यांच्या एकमताने श्री परमेश्वर दत्तू बोराडे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. तसेच उपाध्यक्ष म्हणून श्री इमरान इरशादअली पटेल यांची निवड करण्यात आली.
सदर समिती ही सन 2024 ते 2026 या कालावधीसाठी पुनर्गठीत करण्यात आली..
समितीतील सदस्य खालील प्रमाणे अध्यक्ष श्री परमेश्वर दत्तू बोराडे, उपाध्यक्ष श्री इम्रान इशादाली पटेल,श्री श्रीमंत महादेव गरड, महिला सदस्य म्हणून मोनिका विनोद बोराडे, सुकन्या नितीन नलवडे, उज्वला दादा बोराडे, प्रियंका शिवाजी काळे, संजीवनी महादेव मोरे, राणी जयवंत बोराडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कोंडीराम कोकाटे, शिक्षण प्रेमी नागरिक श्री विलास साहेबराव गरड, शिक्षक प्रतिनिधी दीपक प्रल्हादराव मिरकले, सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र माधव कापसे, विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी जान्हवी देविदास बोराडे, व अरहान इम्रान पटेल यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष श्री अमोल दादाराव गरड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व नूतन सदस्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या..
सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक श्री अंकुश जाधव सर, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक श्री अशोक शिंदे हे लाभले…
सदरील पालक सभेसाठी पालक, विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक, शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. सदरील पालक सभेचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र कापसे सर यांनी केले तर आभार शाळेचे शिक्षक श्री दिपक मिरकले सर यांनी केले…
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
