परंडा तालुका खाजगी शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विकास पॅनलचे वर्चस्व. 

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.                                               परंडा तालुका खाजगी शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या झालेल्या निवडणुकीत विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. पॅनल प्रमुख श्री. अनंत सुर्यवंशी, संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. चंद्रकांत पवार आणि नवनिर्वाचित संचालकांचा कल्याणसागर समुहाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी संवाद निवासस्थानी सत्कार केला.


दि. १४ जुलै रोजी झालेल्या सन २०२४-२९ या पंचवार्षिक निवडणुकीत विकास पॅनल आणि परिवर्तन पॅनल यामध्ये लढत झाली. यात विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व १३ जागेवर मोठ्या मताधिक्याच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.
विकास पॅनलचे प्रमुख श्री. अनंत सुर्यवंशी आणि पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. चंद्रकांत पवार तसेच नवनिर्वाचित संचालक सुरेश बिभीषण गुंजाळ, रणजीत काकासाहेब घाडगे, सुबोधसिंह मानसिंह ठाकूर, चंद्रकांत लक्ष्मण तनपुरे, शफील जानमहंमद पटेल, अमोल अंगद लांडे, कमलाकर धोंडिबा शेळके, आप्पा सुब्राव सुर्यवंशी, चंद्रभागा किसन शेळके, मनिषा गोपीनाथ हिंगे, रामभाऊ महादेव पोफळे, बिभीषण वसुदेव शिंदे व किशोर वामनराव वाघमारे या सर्वांचा सत्कार कल्याणसागर समुहाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी संवाद निवासस्थानी फेटा बांधून, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी राम गोडगे, निर्मलकुमार गांधले, बाळासाहेब काशीद आदी उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!