खाजगी मालकीच्या शेतातून बेकायदेशीर मुरुम उपसा,शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा दिनांक १८ मा.तहसीलदार परंडा यांना
कुमुद गजानन दीक्षित, परंडा ग्रामीण, सर्वे नंबर २५/२, रुई रोड, परंडा,  येथील शेतकरी आहे.   माझ्या मालकीच्या शेतातून बेकायदेशीर मुरुम उचलण्याच्या गंभीर समस्येबाबत माहिती देण्यासाठी  लेखी निवेदन देण्यात आले आहे.निवेदनाची दखल न घेतल्यास १४ऑगस्ट रोजी तहसील कार्यालाया समोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

परंडा ग्रामीणमध्ये रुई रस्त्यालगत १२ एकर २० आर क्षेत्राचा तलाव आहे, ज्याला रुई बालाजी पाजर तलाव संपादित असून. हे क्षेत्र अंदाजे ६७ गुंठे आहे. काही दिवसांपासून, काही ठेकेदार बेसुमार  बेकायदेशीरपणे मुरूम खोदून उपसा  करत आहेत. यामुळे माझ्या मालकीच्या शेतात मोठे खड्डे निर्माण झाले आहेत आणि माझ्या पिकांना मोठे नुकसान झाले आहे.



संबंधित ठेकेदाराचे टीप्पर चालक आणि जेसीबी चालक यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी मला सांगितले की त्यांच्याकडे तहसील कार्यालय परंडाकडून रॉयल्टी भरून मुरुम उचलण्याची परवानगी आहे. मी त्यांना माझ्या मालकीच्या जमिनीवरून मुरुम उचलण्यास मनाई केली, तरीही ते बेकायदेशीररित्या ते काम करत आहेत.

यामुळे मला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मी तुम्हाला विनंती करतो की या प्रकरणाची त्वरित चौकशी करून, मला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यास संबंधित ठेकेदाराला भाग पाडावा. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी योग्य ती कारवाई करावी.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!