मौजे सिरसाव, संपदा ट्रस्ट अंतर्गत मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमास बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा प्रतिनिधी आज दिनांक  ६  रोजी मौजे सिरसाव ता परंडा येथे संपदा ट्रस्ट अंतर्गत मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमास बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
प्रशिक्षणासाठी संपदा ट्रस्ट इंडसइंड बैंक अंतर्गत चार दिवशीय मोफत प्रशिक्षण तर कृषी विभाग, आत्मा विभाग अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया विषयावर महत्वपूर्ण मार्गदर्शन प्रशिक्षणार्थीनां लाभले. उत्पादन, सेवा, व्यापार इ उद्योग विषयांवर मार्गदर्शन महिलांना लाभले यावेळी उपस्थित सरपंच कुमार वायकुळे, कृषी सहायक व्ही. कांबळे, तालुका अभियान व्यवस्थापक तुकाराम ढोरे, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, प्रेरिका सिमा नवले, कृषि सखी वर्षा मिसाळ, पशू सखी जयश्री चोबे, कृषी सहायक राहुल जाधव, प्रभाग समन्वयक विजय गवळी, प्रोजेक्ट ऑफिसर सुजित जगताप, मार्गदर्शक जिल्हा समन्वयक विकास गोफणे व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!