मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी केले वारकऱ्यांना खाऊ वाटप

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर .
पिंपरी चिंचवड:- दि.३०
यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी अन्नधान्य शिधा ,राजगिरा लाडू , बिस्किटचे पुडे यांचे मोठ्या संख्येत वाटप केले.
दरवर्षी लाखो भाविक जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर अशी पायी वारी करत असतात. निगडी येथे शेकडो दिंड्या मुक्कामी असतात. या वारीतील सहभागी वारकऱ्यांना सकाळच्या वेळी खाण्यास आवश्यक असणारे अनेक पदार्थ विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेने आणले होते. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना पायी वारी,वारकरी आणि आपली संत परंपरा शिकविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी शिक्षक गंगाधर सोनवणे,खंडू खेडकर,शिवाजी अंबिके यांनी पुढाकार घेतला.
    या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे, महाविद्यालयाचे व्हिजिटर योगेश ठिपसे, मुख्याध्यापिका  शारदा साबळे, पर्यवेक्षक विजय पाचारणे,कॉलेजच्या समन्वयिका वंदना पांडे,सुजाता बलकवडे,संस्था सदस्य राजीव कुटे यांनी केले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!