अकार्यक्षम उपअधीक्षक भूमी अभिलेख परंडा श्री सुरेश कापसे यांच्यावर कार्यवाही करावी.

Picture of starmazanews

starmazanews

महाराष्ट्र नवनिर्माण सेना परंडा शहर यांच्या वतीने

जिल्हा भुमी अधीक्षक धाराशिव यांच्या कडे निवेदनाव्दारे केली मागणी..


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंड    प्रतिनिधी   
महाराष्ट्र नवनिर्माण सेना परंडा शहर व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परंडा यांच्या वतीने आज दिनांक १ जुलै रोजी
वरील विषयास अनुसरून तक्रारी निवेदन/ अर्ज सादर करण्यात आले की, परंडा कार्यालयाचे उपअधीक्षक श्री सुरेश रामभाऊ कापसे यांच्या अकार्यक्षमतामुळे व भ्रष्ट अचरणामुळे अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील कित्तेक शेतकरी यांची कामे रखडली आहेत.
सदरील उपअधीक्षक हे आठवड्यातील 2 – 2 दिवस उस्मानाबाद येथे बैठकीच्या नावाखाली गैरहजर असतात तसेच विना रजा देता फोन वर मी रजेवर आहे असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करतात
तसेच श्री कापसे यांनी कार्यालयातील शेतकऱ्यांच्या मोजण्या जाणून बुजून रखडून ठेवले आहेत. तसेच कार्यालयात येणारे पोट हिस्सा व बिगर शेती प्रकरणे तात्काळ मोजणी केली जातात परंतु शेतकऱ्यांच्या मोजण्या जाणून बुजून रखडून ठेवले जातात.

तसेच पोटहिस्सा व बिगर शेती प्रकरणात मोजणी झाल्यावर लगेच तात्काळ नकाशे देण्यात येतो, ही कामे तातडीने मार्गी लावून टाकातात. बाकी प्रकरणात असं केले जात नाहीत
जाणून बुजून रखडविले जातात.
ही बाब अतिशय गंभीर आहे, कर्तव्य परायणता राखली जात नाही.

परंतु, मोजणी रजिस्टरला
त्याची नोंद दाखवण्यात येत नाही. मोजणी रजिस्टरला प्रकरण निकाली ठेवल्यानंतर मोजणी नकाशा पुरवण्यात येतो.
परंतु पोटीहिस्सा व बिगर शेती प्रकरणात मोजणी फीस प्राप्त झाल्यानंतर लगेच मोजणी करून नकाशा देण्यात येतो
व नंतर प्रकरण निकाली केले जाते.
असे,
कित्येक प्रकरणात प्रकरण निकाली करण्याअगोदर प्रकरणाचे नकाशे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परंडा याकार्यालयात व
सहाय्यक नगर रचनाकार धाराशिव यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आलेले आहेत.

सदरील प्रकरणी आर्थिक व्यवहारासाठी लवकरात लवकर किंवा मुदतीच्या अगोदर मोजणी केले जातात, परंतु सर्व-सामान्य, शेतकऱ्यांचे प्रकरणी तसेच एक वर्ष पूर्ण झाले तरी रखडत ठेवतात.कारण सामान्य शेतकरी त्यांची आर्थिक मागणी पूर्ण करू शकत नाही उदा. श्री नवनाथ भागवत टीकोरे रा.कोकरवाडी यांनी दिनांक 21/11 /2023 रोजी अती-ताताडीचे मोजणी फीस चलन भरणा केलेली आहे, तो अद्याप ही मोजणी झालेली नाही. परंतु मोर क्रमांक 24 प्रकरणात 06/10/2023 रोजी तातडीची फीस भरणा करून 11/02/2024 रोजी मोजणी करण्यात आलेली आहे. कारण सदर हे प्रकरण हे बिगर शेती असल्याने हद्द कायम आती तातडीचे प्रकरणाच्या अगोदर तातडी मनाला प्राधान्य देण्यात येते.

तसेच भीमा दामू गावडे यांचे एकत्रीकरण अपील प्रकरण 2020 मध्ये परंडा कार्यालयात वरिष्ठांकडून अहवाल करिता पाठवले होते यांना एक वर्षांपूर्वी मोजणी फीस भरणा केलेली आहे परंतु अद्यापही याप्रकरणात काहीच कार्यवाही झालेली नाही

असा प्रचंड प्रमाणात अनागोंदी व भ्रष्ट कारभार हा उपाधीक्षक यांच्या कार्यालयात त्यांच्याच हाताने चालू आहे

तसेच कार्यालयाचे प्रकरणी मुदतीच्या वर गेलेले आहेत ते प्रकरणे ऑनलाईन मोजणी केलेली आहे असे दर्शवून प्रत्येक आदेश काढून मोजणी देतात व वरिष्ठ कार्यालयाची व जनतेची दिशाभूल श्री आर.आर.कापसे कित्येक दिवस झाले हा कारभार करत आहेत.

श्री आर.आर.कापसे,
तत्कालीन मुख्यालय सहाय्यक/निमतनदार श्री ए.ए.माने, तत्कालीन भुमापक श्री प्रशांत खरात यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेले कार्य योग्य ती पडताळणी व चौकशी करून जे-जे दोषीं आढळून येतात नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करावी व

त्यामुळे उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परांडा याकार्यालयाची व श्री आर.आर. कापसे यांची सखोल चौकशी व तपासणी एक समिती नेमणूक करण्यात यावी, तसेच जनतेची व शासनाची होणारी दिशाभूल व जनतेला उडवा-उडवीची उत्तरे देणाऱ्या अकार्यक्षम उपाअधीक्षक श्री आर.आर.कापसे यांची चौकशी करून त्यांच्या कार्यक्षमतेची पडताळणी करून चाचणी देखील करण्यात यावी
तसेच उपाअधीक्षक भूमि अभिलेख परंडा यांच्यावर शासन नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी,
आज दिनांक १/७/२०२४
याप्रकरणी श्री निकम साहेब जिल्हा भूमी अधक्षिक धाराशिव यांनी दोन सदस्य समिती गठीत करून सखोल चौकशी करून नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करावी व तात्काळ अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत

अन्यथा याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी मनसे अध्यक्ष परंडा शहर नवनाथ कसबे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ प्रचार प्रमुख राहुल शंकर बनसोडे उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!