शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या वाढदिवसानिमित्त बावची विद्यालय परंडा, राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, परंडा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा दि.1/7/2024
मराठवाड्याचे सुपुत्र व महाराष्ट्रातील शिक्षकांचे तारणहार आमदार विक्रम काळे यांचा एक जुलै रोजी वाढदिवस होत आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी थोड्याशा भावना व्यक्त करून त्यांना भविष्यात दीर्घायुष्य व निरोगी आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना .
कायम विना अनुदानित शाळांचा कायम शब्द काढण्यापासून ते शाळांना 20 % , 40% , 60 % अनुदान देण्यापर्यंतचा लढा तितकासा सोपा नव्हता. तसेच आज सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , वित्तमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे याच पावसाळी अधिवेशनात निर्णय झाला पाहिजे यासाठी आमदार विक्रम काळे काम करत आहेत. परंतु आमदार विक्रम काळे यांनी वेळोवेळी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सभागृहात व सभागृहाच्या बाहेर शासनाला धारेवर धरून या शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार चालू करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे. किंबहुना त्यांच्यामुळे आज अनेक शिक्षकांचे चांगले झालेले आहे. म्हणूनच मराठवाड्यातील शिक्षकांनी चौथ्या वेळेस आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात टाकली. शिक्षक हाच माझा धर्म व शिक्षक हीच माझी जात असे समजून शिक्षकांसाठी अहोरात्र काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल .
धाराशिव लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळत असताना त्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाकडे मला शिक्षकांसाठी काम करायचं आहे हा उदार भाव दाखवून शिक्षकांसाठी भविष्यामध्ये काम करायचे असल्याचे ते वारंवार बोलतात.
सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी संमेक समिती असेल तसेच शासन दरबारी वेळोवेळी यासाठी पाठपुरावा करणे असेल यासाठी आमदार विक्रम काळे सतत प्रयत्नशील असतात. 2005 पूर्वी च्या शिक्षक कर्मचाऱ्यांना व 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी शिक्षक आमदार विक्रम काळे याचे योगदान फार मोठे आहे. या कार्यात महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळाकृती समितीचे श्री खंडेराव जगदाळे सर यांनी शाळांना अनुदान मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा असेल किंवा शासनाच्या विरुद्ध शेकडो आंदोलने असो हे कार्य सुद्धा महत्वाचे आहे.
कायम विना अनुदानित शाळांचा कायम शब्द काढण्यापासून ते टप्पा अनुदान मिळवण्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सभागृहात व सभागृहाच्या बाहेर अशी दोन ठिकाणी योग्य नियोजनबद्द लढाई लढणे असेल शासनाला प्रश्न विचारून धारेवर धरणे असेल याचेच फलीत म्हणून की काय आज कित्येक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळा या अनुदानावर आल्या आहेत. तर आज शासन जुनी पेन्शन बाबत सकारात्मक विचार करत आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न संपलेले नाहीत किंबहुना संपणार ही नाहीत पण लढाई चालूच आहे कांही प्रश्न सुटत आलेले आहेत कांही सुटण्याच्या मार्गावर आहेत. अनेक वेळा सत्तेत असताना सुद्धा सभागृहात विविध आयुधांचा वापर करून शासनाला धारेवर धरण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाचा धडाका पाहता मराठवाड्याचे माजी शिक्षक आमदार कै. वसंतराव काळेसाहेब याची उणीव भासू दिलेली नाही. 8 जिल्हे 76 तालुके असा प्रचंड मोठा मतदार संघ असताना सुद्धा जनसंपर्क ठवण्याचे त्यांचे कसब हे अगदी वाखाणण्याजोगे आहे. दर वर्षी पळसप या त्यांच्या गावी ग्रामीण साहीत्य संमेलन आयोजित करून मराठवाड्यातील साहित्यिकांना कवींना मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहेत. मराठवाड्यातील अनेक शाळांना पुस्तक वाटप, संगणक, व इतर साहित्य वाटप, शाळा भेटी, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध कार्यक्रमास उपस्थित राहणे त्यांचे प्रश्न ऐकणे त्यांना मार्गदर्शन व प्रश्न सोडवून घेणे हे काम अविरतपणे चालू आहे.
प्रत्येक जिल्हा निहाय शिक्षक दरबार घेऊन सर्व अधिकाऱ्यांना आमंत्रित करून त्याच ठिकाणी जागेवर प्रश्न सोडवण्याचा हातखंडा आमदार विक्रम काळे यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये राबवून शिक्षकाप्रती आपल्या भावना व प्रेम दाखवण्याचं काम त्यांनी वारंवार केलेले आहे.
मराठवाड्याचे सुपुत्र शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यालयात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच लहान गटातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पंचायत समिती परंडाचे गट शिक्षणाधिकारी श्री अर्जुन जाधव साहेब, एस बी. आय. शाखा परंडा चे मॅनेजर श्री. माने साहेब, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बिभिषण रोडगे सर, प्राचार्य श्री नारायण खैरे सर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.