मौजे देवगांव येथे मा.धनंजयदादा सावंत  यांच्या हस्ते देवगाव ते शिंदे वस्ती,आहेर वस्ती, चौधरी वस्ती  रस्त्याचे भूमिपूजन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा तालुक्यातील मौजे  देवगांव तालुका परंडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी माननीय धनंजय दादा सावंत साहेब यांच्या हस्ते देवगाव  ते शिंदे वस्ती,आहेर वस्ती, चौधरी वस्ती या रस्त्याचे भूमिपूजन  दिनांक 27 जून 2024 रोजी देवगांव येथील ग्रामस्थांनी माननीय धनंजय दादा सावंत साहेब यांच्याकडे शिंदे , चौधरी, आहेर वस्ती कडे जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळेत्या रस्त्यावर आपण मुरूम टाकून येण्या-जाण्याची व्यवस्था करावी 100 लोक वस्ती असलेली वस्ती विकासापासून दळणवळणापासून वंचित होती माननीय धनंजय दादा सावंत साहेब यांनी लगेचच ग्रामस्थांची मागणी मान्य करून रस्त्याची पाहणी करून आज दुसऱ्याचे दिवशी रस्त्याचे काम चालू केले भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून राज्याचे आरोग्य मंत्री माननीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या आदेशाने व माननीय धनंजय सावंत साहेब यांच्या नेतृत्वात आज या रस्त्याचे काम चालू झाले गावातील सर्व ग्रामस्थांनी माननीय धनंजय दादा सावंत साहेबांचे आभार मानले व त्यांचा सन्मान केला .

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!